शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांचा हलगर्जीपणा! नवजात बाळाला मृत ठरवले, अंत्यसंस्काराच्या वेळी बाळ रडू लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 17:08 IST

Bhopal Shocking News: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका जिवंत नवजात बाळाला मृत घोषित करण्यात आले. कुटुंबाने अंत्यसंस्काराची सर्व तयारी पूर्ण केल्यानंतर तब्बल चार तासांनी बाळ जिवंत असल्याचे समजताच सर्वांनाच धक्का बसला. 

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित महिलेने सकाळी ७ ते ७:३० च्या सुमारास एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, जन्म झाल्यानंतर काही वेळातच म्हणजे सकाळी ८:१५ वाजता ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी तपासणी करून बाळ दगावल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर डॉक्टरांनी तातडीने मुलीचे मृत्यू प्रमाणपत्रही कुटुंबाच्या हाती सोपवले. 

बाळाच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. हसतं-खेळतं घर एका क्षणात शांत झाले. रडत-भडत कुटुंबाने दफनविधीची तयारी सुरू केली. बाळाला गुंडाळण्यासाठी कफनही खरेदी केले. मात्र, मृत घोषित केल्याच्या साधारण चार तासांनंतर, अंत्यसंस्कारापूर्वी बाळ हालचाली करू लागला. कुटुंबीयांनी नीट पाहिले असता बाळ जिवंत असल्याचे स्पष्ट झाले.

जिवंत बाळाला मृत ठरवल्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांच्या कार्यक्षमतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्या डॉक्टरांनी मृत्यू प्रमाणपत्र दिले, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबाने केली आहे. थोड्याशा चुकीमुळे एका चिमुकलीचा जीव जाण्याची भीती या घटनेमुळे निर्माण झाली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Doctor's Negligence: Newborn Declared Dead, Found Alive During Funeral!

Web Summary : In Bhopal, a newborn was wrongly declared dead by doctors. Family prepared for the funeral, but four hours later, they discovered the baby was alive, raising serious questions about the hospital's negligence and demanding action against the doctor.
टॅग्स :bhopal-pcभोपाळ