शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 06:12 IST

रुग्णांना प्रायोगिक उंदीर किंवा एटीएम समजून पैसे उकळण्यासाठी वापरले जाते, अशा कठोर शब्दांत अलाहाबाद उच्च न्यायालयाने खाजगी रुग्णालयांवर टीका केली.

डॉ. खुशालचंद बाहेतीलोकमत न्यूज नेटवर्कअलाहाबाद : रुग्णांना प्रायोगिक उंदीर किंवा एटीएम समजून पैसे उकळण्यासाठी वापरले जाते, अशा कठोर शब्दांत अलाहाबाद उच्च न्यायालयाने खाजगी रुग्णालयांवर टीका केली आणि वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणात डॉक्टरविरुद्धचा गुन्हा रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला.२९ जुलै २००७ रोजी एका गरोदर महिलेला उत्तर प्रदेशातील खासगी नर्सिंग होम चालवणारे डॉ. अशोककुमार राय यांच्याकडे दाखल करण्यात आले. सकाळी ११ वाजता कुटुंबीयांनी सिझेरियन शस्त्रक्रियेस संमती दिली होती. मात्र, शस्त्रक्रिया सायंकाळी ५:३० वाजता झाली आणि तोपर्यंत गर्भातील भ्रूणाचा मृत्यू झाला होता.त्याचदिवशी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये असेही नमूद आहे की, डॉक्टरच्या कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांनी विरोध दर्शविल्यावर त्यांच्यावर हल्ला केला. शिवाय, डॉक्टरने आधीच ८,७०० रुपये घेतले होते आणि १०,००० रुपये अधिक मागितले, तसेच डिस्चार्ज स्लिप देण्यास नकार दिला.डॉ. राय यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू), ३१५ (जन्म रोखणे), ३२३ (इजा), व ५०६ (धमकी) अंतर्गत सुरू असलेल्या खटल्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. नेमके काय घडले होते?आपल्याकडे वैद्यकीय पात्रता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, फिर्यादी पक्षाने याला विरोध केला आणि महिलेची प्रकृती दाखल होताना स्थिर होती, परंतु भूलतज्ञ वेळेवर उपलब्ध नसल्याने डॉक्टरने शस्त्रक्रिया उशिरा केली, असे सांगितले. मेडिकल बोर्डाचा अहवाल अविश्वसनीय आहे, कारण त्यात मृत भ्रूणाच्या उत्तरीय तपासणी अहवालाचा विचारच करण्यात आलेला नाही, ज्यात प्रसव वेदनांमुळे मृत्यू झाल्याचे नमूद आहे. ऑपरेशन थिएटरचा टीपही विरोधाभासी होता, असे मुद्दे मांडले. न्यायालयाने फिर्यादीच्या या मुद्द्यांशी सहमती दर्शवलीउच्च न्यायालयाचे निरीक्षणज्याप्रमाणे एक प्रामाणिक डॉक्टर आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडतो, त्याचे रक्षण होणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे केवळ पैशासाठी अपुऱ्या सुविधा असलेली नर्सिंग होम चालवणाऱ्यांचे रक्षण होऊ शकत नाही. डॉक्टरला कायदेशीर संरक्षण तेव्हाच मिळते जेव्हा व्यावसायिक निकषानुसार काळजी घेतली जाते. खासगी रुग्णालये रुग्णांना ‘गिनी पिग’ किंवा ‘एटीएम’ म्हणून पाहतात.- न्या. कुमार

टॅग्स :hospitalहॉस्पिटलCourtन्यायालय