शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

वैद्य, हकिमांना द्यावी लागेल आता डॉक्टरकीची परीक्षा, केंद्राची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 05:21 IST

भारतीय उपचार पद्धतींसाठी ‘नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम फॉर मेडिसीन बिल २०१८’ला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून, आयुर्वेद, युनानी, सिद्धा व स्वोरिगपाच्या परीक्षेसाठी नवीन बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : भारतीय उपचार पद्धतींसाठी ‘नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम फॉर मेडिसीन बिल २०१८’ला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून, आयुर्वेद, युनानी, सिद्धा व स्वोरिगपाच्या परीक्षेसाठी नवीन बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याच प्रकारचा बोर्ड होमिओपॅथी परीक्षेसाठीही तयार करण्यात येणार आहे. या सर्व उपचार पद्धतींमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट देण्याबरोबरच एक्झिट परीक्षाही द्यावी लागेल.केंद्रीय विधि व माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, याद्वारे भारतीय उपचार पद्धतीला एक सुव्यवस्थित रूप प्राप्त करून देण्याबरोबरच याला अ‍ॅलोपॅथी पद्धतीच्या नियमनासाठी स्थापित करण्यात येणाºया आयोगाप्रमाणे एक पारदर्शक, मानकपूर्ण आयोगाच्या अंतर्गत आणणे, हा उद्देश आहे. याद्वारे या क्षेत्रातील सर्व चिंता दूर केल्या जाऊ शकतील. आधीपासूनच या पद्धतींमध्ये उपचार करणारे वैद्य व हकिमांबरोबरच इतरांनाही लागू होणाºया नियमाच्या प्रश्नावर रविशंकर प्रसाद म्हणाले की, सरकारने या विधेयकाला मंजुरी दिलेली आहे. आता संसदेत यावर चर्चा होईल. त्यानंतर या कायद्याचे अंतिम स्वरूप कोणते असेल, हे स्पष्ट होईल. हा आयोग स्थापन झाल्यानंतर विद्यमान सेंट्रल कौन्सिल फॉर इंडियन मेडिसीन त्यात समाविष्ट होईल. या आयोगाच्या अंतर्गत चार स्वायत्त बोर्ड स्थापन केले जातील. ते आयुर्वेद, युनानी, सिद्धा, स्वोरिगपा बोर्ड असतील व ते या क्षेत्रातील शिक्षण निश्चित करतील. याबरोबरच अन्य दोन बोर्ड असतील. त्यातील एक विविध शैक्षणिक संस्थांना या भारतीय चिकित्सा पद्धती शिकविण्यासंबंधी मान्यता देणे, त्यांचे रेटिंग करण्याचा अधिकार देईल. बोर्ड आॅफ एथिक्स अ‍ॅण्ड रजिस्ट्रेशन आॅफ प्रॅक्टिशनर्स आॅफ इंडियन सिस्टीम आॅफ मेडिसीन हा दुसरा बोर्ड असेल. हे बोर्ड सिद्धांतांबाबत प्रकरणांबरोबरच या पद्धतींमधील सेवा देणाºयांचे एक नोंदणी रजिस्टर ठेवील.वेगळा आयोग, वेगळे बोर्ड स्थापन करणारविधिमंत्र्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षेबरोबरच एक्झिट परीक्षाही असेल. या पद्धती शिकवणारांसाठीही मानक तयार करण्यात येणार आहेत. त्यांच्यासाठी मानकपूर्ण परीक्षा घेण्यात येईल. त्यांना नियुक्ती-पदोन्नतीपूर्वी ही परीक्षा द्यावी लागेल. यामुळे या पद्धतींच्या उपचाराचे नियमन होण्याबरोबरच त्यात पारदर्शकताही येईल.आयुर्वेद, युनानी, सिद्धा व स्वोरिगपाप्रमाणेच होमिओपॅथी शिक्षणासाठीही पावले उचलली जातील. त्यासाठी वेगळा आयोग स्थापन केला जाईल व त्यासाठी वेगळे तीन बोर्ड स्थापन केले जातील. यातील एक बोर्ड शिक्षणाशी संबंधित प्रकरणे पाहील, दुसरे बोर्ड होमिओपॅथी शिक्षणाशी संबंधित मान्यता व रेटिंग-रँकिंगचे काम करील.तिसरे बोर्ड एथिक्स व पंजीकरणाशी संबंधित असेल. येथेही विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षेबरोबरच एक्झिट परीक्षा असेल. शिक्षणाची नियुक्ती-पदोन्नतीसाठीही परीक्षेची तरतूद असेल.

टॅग्स :doctorडॉक्टरMedicalवैद्यकीय