शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रिल्समध्ये सिनेमाचे संगीत वापरता ? असे करणे पडू शकते महागात, दाखल होऊ शकतो गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 09:55 IST

Film Music In Reels: सोशल मीडियावर रिल्स बनवून अनेक जण प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन रिल्स बनविणाऱ्या हौशी लोकांचीही कमी नाही. मात्र, अशी प्रेरणा अंगलट येऊ शकते.

नवी दिल्ली : सोशल मीडियावर रिल्स बनवून अनेक जण प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन रिल्स बनविणाऱ्या हौशी लोकांचीही कमी नाही. मात्र, अशी प्रेरणा अंगलट येऊ शकते. भारत जोडो यात्रेत केजीएफ चित्रपटाच्या संगीताची नक्कल केल्याच्या आरोपावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या इतर काही सहकाऱ्यांवर कॉपीराईट उल्लंघनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तुम्ही रिल्समध्ये असा प्रकार केल्यास तुमच्यावरही असाच गुन्हा दाखल होऊ शकतो.

कॉपीराईट कायदा काय?कॉपीराईट संरक्षण करण्यासाठी ‘कॉपीराईट ॲक्ट १९५७’ हा कायदा आहे. अस्सल कामांची नक्कल करता येत नाही. प्रताधिकाराचा हक्क संबंधित कंटेंटच्या निर्मात्यास असतो; पण, निर्मात्याच्या कर्मचाऱ्यासही हा हक्क मिळू शकतो. एखादा कंटेंट तुम्ही स्वत: निर्माण केला असेल अथवा त्याचे हक्क असतील तरच  तुम्ही या कायद्याचा वापर करू शकता. कंटेंटच्या मालकीचे योग्य दस्तऐवज त्यासाठी तुमच्याकडे हवेत.

काय आहे कॉपीराईट?स्थावर, जंगम मालमत्तेप्रमाणेच बौद्धिक संपदाही वैयक्तिक मालकीची असते. तिची चोरी केल्यास कॉपीराईट उल्लंघनाचा गुन्हा होतो. उदा. : एखाद्या लोकप्रिय अल्बममधील गाणी दुसरा कोणी वापरत असेल, तर ती एक प्रकारची चोरीच असते. येथे कॉपीराईट उल्लंघनाचा कायदा लागू होतो. काँग्रेसने केजीएफचे संगीत आपल्या प्रचार व्हिडिओत वापरले होते. त्यासाठी त्यांनी संगीत निर्मिती करणाऱ्याची परवानगी घेतली नव्हती; त्यामुळे येथे थेट कॉपीराईट उल्लंघन झाले आहे. कुठलेही लेखन, मजकूर, संगीत आणि चित्रपट यांवर मालकाचा कायदेशीर अधिकार असतो. त्यांचा वैयक्तिक वापर केला जाऊ शकतो; पण व्यावसायिक वापर केल्यास कॉपीराईटचे उल्लंघन होते. 

सोशल मीडियाचा वापर कसा करणार ? इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब यांसारख्या समाजमाध्यमांवर रिल्स आणि शॉर्ट्समध्ये संगीत देण्यासाठी हे प्लॅटफॉर्म काही इनबिल्ट म्युझिक कॅटलॉग देतात. त्याचे अधिकार या प्लॅटफॉर्म्सनी खरेदी केलेले असतात. ते वापरल्यास प्रताधिकाराचे उल्लंघन होणार नाही.या प्लॅटफॉर्म्सनी दिलेल्या कॅटलॉगबाहेरील संगीत अथवा अन्य कंटेंट तुम्ही वापरल्यास प्रताधिकाराचे उल्लंघन होईल.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाYouTubeयु ट्यूबmusicसंगीत