शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

तुम्ही मूनलायटिंग करता? कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये या शब्दाची प्रचंड चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 10:19 IST

तुम्ही तुमची मुख्य नोकरी सांभाळून अन्य माध्यमांतून पैसा कमावता का, असा आहे.

शीर्षक वाचून मूनलायटिंग करता का, म्हणजे काय? किंवा आता हा काय नवीन प्रकार आहे, असा प्रश्न पडेल. पण सध्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये या शब्दाची प्रचंड चर्चा आहे. याचा सोपा अर्थ म्हणजे, तुम्ही तुमची मुख्य नोकरी सांभाळून अन्य माध्यमांतून पैसा कमावता का, असा आहे.

मनोज गडनीस

मूनलायटिंग म्हणजे नेमके काय?या शब्दाचे उमगस्थान अमेरिकेत आहे. अमेरिकेतील नोकरदार वर्गाने मंदीच्या अनुभवानंतर रोजच्या ९ ते ५ या कामाच्या वेळेनंतर चंद्रोदयाच्या वेळी अर्थात संध्याकाळी दुसरे काम करत पैसे कमाविण्यास सुरुवात केली. तसेच शनिवार-रविवार या दोन सुट्ट्यांच्या दिवशी काम करून अतिरिक्त पैसे मिळविण्यास सुरुवात केली. रोजच्या कामानंतर म्हणजे संध्याकाळी करण्यात येणाऱ्या कामामुळे या संकल्पनेला मूनलायटिंग असे संबोधण्यात येते. 

कशी झाली सुरुवात?याची सुरुवात जरी अमेरिकेत झाली असली तरी भारतामध्ये स्वीगी कंपनीने सर्वप्रथम कंपनीचे मूनलायटिंग धोरण जाहीर केले. या धोरणानुसार, कंपनीच्या कर्मचाऱ्यांना काही शर्ती व अटींच्या अधीन राहून दुसरे काम करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, या संकल्पनेने खरा वेग घेतला तो आयटी उद्योगात. लॉकडाऊनपासून आजपर्यंत अनेक आयटी कंपन्यांचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. रोजचे काम संपल्यानंतर आपल्या गुणवत्तेचा, कौशल्याचा वापर करून ते अन्य काम करत पैसे मिळवत आहेत.    

कंपन्यांचे म्हणणे काय?मूनलायटिंगवरून आयटी कंपन्यांमध्ये २ गट पडले आहेत. पहिल्या गटाचे म्हणणे असे की, एखादी व्यक्ती जर एका ठिकाणी काम करत पैसे मिळवत असेल तर त्याचवेळी दुसरीकडून पैसे मिळवणे हे अनैतिक आहे. तसेच, एखाद्या कर्मचाऱ्याने असे केल्यास त्याचे मुख्य कामातील लक्ष विचलित होऊ शकते.दुसऱ्या गटाचे म्हणणे असे आहे की, कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीच्या कंत्राटाप्रमाणे ठराविक तास कंपनीसाठी काम करणे बंधनकारक आहे. त्यानंतर त्याने काय करायचे, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तसेच, समजा कर्मचाऱ्याने मुख्य कंपनीच्या कामात अडथळा, बाधा येणार नाही, अशारितीने केले तर त्याला कंपनीची हरकत नसावी. यातून त्या कर्मचाऱ्याकडे अन्य प्रकारचे कौशल्य विकसित होईल.

हे कायदेशीर आहे का?देशातील फॅक्टरी ॲक्ट १९४८ च्या कलम ६० नुसार दोन ठिकाणी नोकरी करणे बेकायदेशीर आहे. मात्र, या कारखान्याशी संबंधित ही व्याख्या असल्याने आयटी अथवा सेवा क्षेत्राला या कायद्याच्या कक्षेत येत नाहीत.मात्र, प्रत्येक राज्यामध्ये ‘द शॉप अँड एस्टॅब्लिशिमेंट ॲक्ट’ आहे. या कायद्यानुसारदेखील दोन ठिकाणी नोकरी करणे अवैध आहे. एखादी कंपनी मूनलायटिंग संदर्भात जो धोरणात्मक निर्णय घेईल तो त्या कर्मचाऱ्यांवर बंधनकारक असेल.

एकावेळी दोन ठिकाणी नोकरी करून पैसे कमाविणे ही मूनलायटिंगची व्याख्या ग्राह्य धरली जाते. मात्र, या निमित्ताने सुरू झालेल्या वादामध्ये आणखी एका मुद्द्याची भर पडली आहे. 

ती अशी की, जर एका ठिकाणी नोकरी करत असलेल्या व्यक्तीने ते काम संपल्यानंतर, आपल्या छंदाच्या माध्यमातून जर पैसे कमावले तर त्याची गणना मूनलायटिंगमध्ये करणार का?, आजच्या घडीला अनेक लोक शेअर बाजाराच्या गुंतवणुकीतून पैसा कमावतात किंवा सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर्स म्हणून काम करतात. त्याद्वारेदेखील त्यांना पैसे मिळतात. 

कर्मचाऱ्यांनी सोशल मीडिया कसा वापरावा, या संदर्भात अनेक कंपन्यांची काही खास पॉलिसी नाही. अशा स्थितीत या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांची गणना पण मूनलायटिंगमध्ये केली जाणार का, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई