शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

पीएनबीची पहिली शाखा कुठे उघडली तुम्हाला माहिती आहे का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 18:17 IST

11 हजार कोटींच्या महाघोटाळ्यानंतर पंजाब नॅशनल बँक अडचणीत सापडली आहे. देशातील या सर्वात मोठ्या दुस-या क्रमांकाच्या बँकेला विजय माल्यापासून नीरव मोदीसारख्या उद्योगपतींनी चुना लावला.

नवी दिल्ली- 11 हजार कोटींच्या महाघोटाळ्यानंतर पंजाब नॅशनल बँक अडचणीत सापडली आहे. देशातील या सर्वात मोठ्या दुस-या क्रमांकाच्या बँकेला विजय माल्यापासून नीरव मोदीसारख्या उद्योगपतींनी चुना लावला. परंतु या बँकेचा इतिहास भारताला आर्थिकदृष्ट्या मजबूत करणारा राहिला आहे. पंजाब नॅशनल बँकेचा इतिहास हा 122 वर्षं जुना आहे. 1900मध्ये या बँकेची पहिली शाखा लाहोरच्या बाहेरील कराची-पेशावर(आताचं पाकिस्तान)मध्ये उघडण्यात आली होती.या बँकेची सुरुवात करण्यासाठी स्वातंत्र्यसेनानी लाला लजपत राय यांनी मोलाचं योगदान दिलं होतं. त्यावेळी लाल लजपत राय यांच्याबरोबर स्वातंत्र्याच्या अभियानाशी जोडले गेलेले दयाल सिंह मजिठिया, पंजाबचे पहिलं उद्योगपती लाला हरकिशन लाल, काली प्रसन्न रॉय, पारशी उद्योगपती ईसी जेस्सावाला, मूल्तानचे राजे प्रभू दयाल, जयशी राम बक्षी आणि लाला डोलन दास यांनी बँकेची पायाभरणी केली. बँक पूर्णतः भारतीय चलनावर सुरू झाली होती. त्यावेळी 14 मूळ शेअर्स होल्डर आणि 7 संचालकांनी फारच कमी शेअर्स घेतले. त्यामागे बँक सामान्य लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावी हा उद्देश होता.या बँकेत महात्मा गांधींसह लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू, जालियन वाला बाग कमिटीचंही बचत खातं होतं. पंजाब नॅशनल बँकेचं राष्ट्रीयीकरण 1969मध्ये इतर बँकांसोबत झालं होतं. ब्रिटन, हाँगकाँग, काबूल, शांघाई आणि दुबईमध्ये या बँकेच्या शाखा आहेत. सद्यस्थितीत पंजाब नॅशनल बँकेत जवळपास 10 कोटी खातेधारक आहेत. देशात पंजाब नॅशनल बँकेच्या 6947 शाखा आहेत. तसेच 9753 एवढं एटीएम सेंटर आहेत. सप्टेंबर 2017मध्ये बँकेतील एकूण जमा ठेवी 6.36 लाख कोटी रुपये होती. पीएनबीचा एकूण एपीए हा 57,630 आहे. 

टॅग्स :Punjab National Bankपंजाब नॅशनल बँकPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा