शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यावर कातडे ओढल्याने भिंतीवरचेही दिसत नाही!, विरोधक म्हणजे शल्यवृत्तीचे टीकाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 05:50 IST

गेल्या दोन तिमाहींत भारताचा विकासदर अपेक्षेहून कमी झाल्याचे निमित्त साधून एकसुरात गळा काढणाºया टीकाकारांना महाभारतातील शल्याची उपमा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी त्यांच्यावर उघड हल्लाबोल केला.

नवी दिल्ली : गेल्या दोन तिमाहींत भारताचा विकासदर अपेक्षेहून कमी झाल्याचे निमित्त साधून एकसुरात गळा काढणाºया टीकाकारांना महाभारतातील शल्याची उपमा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी त्यांच्यावर उघड हल्लाबोल केला. डोळ्यावर कातडे ओढल्याने भिंतीवरचेही दिसत नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. मागील व आताच्या सरकारच्या काळातील आकडेवारी देत त्यांची ओरड बिनबुडाची असल्याचा दावा केला.‘इन्स्टिट्यूट आॅफ कंपनी सेक्रेटरीज् आॅफ इंडिया’च्या कार्यक्रमात मोदींच्या भाषणाचा मुख्य रोख गेल्या काही दिवसांत सरकारवर टीका करणाºया विरोधकांवर व स्वपक्षीयांवरही होता. टीका करणारे हे लोक गैरसोयीचे असते, तेव्हा सरकारच्या आकडेवारीवर शंका घेतात आणि सोयीचे असते तेव्हा तीच आकडेवारी ब्रह्मवाक्य मानून टीका करतात, असे ते म्हणाले. व्यासपीठावर मोदी यांनी भाषणात उल्लेख केलेल्या प्रत्येक मुद्द्याची आकडेवारी तक्त्याच्या स्वरूपात दाखविण्याची खास व्यवस्था करण्यात आली होती.सरकार प्रामाणिकांच्या पाठीशीमोदी म्हणाले, देशाच्या बदलत्या अर्थव्यवस्थेत प्रामाणिकांची कदर केली जाईल. व्यापाºयांना भूतकाळातील कुलंगडी तर बाहेर काढली जाणार नाहीत, याची भीती असल्याची मला कल्पना आहे. परंतु त्यांच्यामागे शुल्ककाष्ठ लावले जाणार नाही. जीएसटीच्या व्यवस्थेत देशहितासाठी जे काही बदल व सुधारणा करणे गरजेचे असेल, ते सरकार नि:संकोचपणे करेल.भाषणात महाभारतातील ‘शल्य’मोदी म्हणाले की, महाभारतात शल्य नावाचे एक पात्र होते. शल्य हा कर्णाचा सारथी होता. युद्धात जे काही दिसायचे ते पाहून हा शल्य कर्णाला एकसारखा हतोत्साहित करत असे. नैराश्याचे वातावरण पसरवीत असे. आज शल्य नसला तरी शल्यवृत्ती कायम आहे. अशा लोकांना नैराश्य पसरविण्यातच आनंद मिळतो. एखाद-दुसºया तिमाहीत अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर कमी झाला तरी त्यांच्यासाठी ती मोठी बातमी होते.पंतप्रधानांनी मांडला आकडेवारीचा फ्लॅशबॅकमी कोणी अर्थतज्ज्ञ नाही किंवा मीतसा दावाही केलेला नाही; पण आज देशात अर्थव्यवस्थेवर एवढी चर्चा होत असताना मला जरा ‘फ्लॅशबॅक’मध्ये जाण्याखेरीज गत्यंतर नाही.सातत्याने सात टक्क्यांहून वृद्धीदर असलेल्या अर्थव्यवस्थेचा विकास दोन तिमाहींत ५.७ व ६.१ टक्के झाल्यावर टीका सुरूझाली. परंतु विकासदर या पातळीवर येण्याची ही पहिली वेळ नाही.पूर्वीच्या सरकारच्या काळात आठ वेळा विकासदर ५.७ टक्के वा त्याहून खाली होता. काही वेळा तर तर तो ०.२ टक्के ते १.५ टक्के एवढाही घसरला होता.घामाचा पैसा सुरक्षितनागरिकांनी घाम गाळून कमावलेल्या प्रत्येक पैशाची सरकारला जाणीव आहे. त्यामुळे गरीब व मध्यमवर्गाचे जीवन सुसह्य करण्यासोबतच त्यांचे पैसेही वाचावेत हे डोळ्यांपुढे ठेवूनच सरकारची धोरणे व योजना राबविल्या जात आहेत. वर्तमानाच्या चिंतेने देशाचे भविष्य वाºयावर न सोडण्याचे भान सरकारला आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :GovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा