शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विस्तवाशी खेळू नका, हात पोळून घ्याल!; उचापतखोरांना सुप्रीम कोर्टाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 02:52 IST

न्यायसंस्थेस वेठीसही धरता येते असा समज काही दांडगटांनी व धनदांडग्यांनी करून घेतला असेल तर ती त्यांची फार मोठी चूक आहे. ते विस्तवाशी खेळत आहेत. त्याने त्यांचेच हात पोळतील.

नवी दिल्ली : देशाच्या कानाकोपऱ्यातून रिमोट कंट्रोलने सूत्रे हलवून, हवा तसा न्याय विकत घेता येतो, त्यासाठी न्यायसंस्थेस वेठीसही धरता येते असा समज काही दांडगटांनी व धनदांडग्यांनी करून घेतला असेल तर ती त्यांची फार मोठी चूक आहे. ते विस्तवाशी खेळत आहेत. त्याने त्यांचेच हात पोळतील. न्यायसंस्था त्यांना पुरून उरेल, असा सज्जड इशारा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. न्यायालयाच्या देखरेखीखाली ‘एसआयटी’ नेमून या प्रकरणाचा तपास केला जावा, असा आग्रह सॉलिसिटर जनरल तुषार मेहता धरू लागले, तेव्हा न्या. मिश्रा कडाडले, काय करायचे ते तुम्ही आमच्यावर सोपवा. प्रत्येक महत्त्वाचे प्रकरण सुनावणीस येण्याच्या आधी काही मंडळी त्यात लुडबुड करण्यासाठी न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये खेटे घालत असतात. पण कोणीही पैशाच्या आणि राजकीय ताकदीच्या जोरावरसर्वोच्च न्यायालयास हवे तसे नाचवू शकणार नाही, हे पक्के लक्षात ठेवा. या प्रकरणाच्या तपासाशी सरकारचा संबंध ठेवू नका. तसेचअ‍ॅड. बैन्स यांची पार्श्वभूूमीही तपासा, असे सुचविण्यासाठी ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग उभ्या राहिल्या. त्यांना थांबवत न्या. मिश्रा म्हणाले, आम्हाला जास्त बोलायला भाग पाडू नका. न्यायालय वकीलमंडळींचे आहे. आम्ही न्यायाधीश येतो आणि जातो! फली नरिमन, नानी पालखीवाला, पराशरन अशा दिग्गजांनी ही संस्था उभारली आहे. पण येथे रोज ‘बेंच फिक्सिंग’चे वा अन्य गैरप्रकार कानावर येतात. मोठ्या केसची सुनावणी असल्यास पत्रे लिहिली जातात. पैशाच्या जोरावर काही लोक रजिस्ट्रीमध्ये सूत्रे हालविण्याचे प्रयत्न करतात. हे अति होत आहे. हे नक्कीच थांबायला हवे. आम्ही हे थांबविणार हेही नक्की.

न्यायमूर्ती झाले उद्विग्नसरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याशी असभ्य वर्तन केले जाण्यामागे फार मोठे कारस्थान आहे, या अ‍ॅड. उत्सवसिंग बैन्स यांच्या दाव्याच्या अनुषंगाने न्या. अरुण मिश्रा, न्या. रोहिंग्टन नरिमन व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत आपली उद्विग्नता व्यक्त केली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय