शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

जम्मू-काश्मीरला युद्धाचा आखाडा बनवू नका! महबूबा मुफ्तींचे मोदी आणि पाकिस्तानला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 14:16 IST

पाकिस्तानकडून सातत्याने होच असलेल्या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेवर युद्धसदृश वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात आतापर्यंत भारताच्या 5 जवानांना वीरमरण आले आहे. तर 6 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी सीमारेषेवरील तणाव निवळण्यासाठी भावूक आवाहन केले आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तानकडून सातत्याने होच असलेल्या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेवर युद्धसदृश वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात आतापर्यंत भारताच्या 5 जवानांना वीरमरण आले आहे. तर 6 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी सीमारेषेवरील तणाव निवळण्यासाठी भावूक आवाहन केले आहे. सीमारेषेवर रक्ताची होळी खेळली जात आहे. कृपया  जम्मू - काश्मीरला युद्घाचा आखाडा बनवू नका, असे आवाहन महबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानला केले आहे. महबुबा मुफ्ती रविवारी पोलीस काँन्स्टेबलांच्या पासिंग आऊट परेडला उपस्थित राहिल्या होत्या. त्यावेळी त्या म्हणाल्या," आमच्या सरहद्दीवर एक प्रकारची रक्ताची होळी खेळली जात आहे. पंतप्रधान एकीकडे म्हणतात की देशाने विकासाच्या रस्त्यावर चालले पाहिजे. पण दुसरीकडे आमच्या राज्यात नेमकी याच्या उलट परिस्थिती आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानला विनंती करते की, जम्मू-काश्मीरला आखाडा बनवू नका.  दोन्ही देशांमध्ये मैत्रिचा सेतू बांधा." गुरुवारपासून नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सुरू असलेल्या गोळीबारात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये बीएसएफ आणि लष्कराच्या 5 जवानांचाही समावेश आहे.  जम्मू काश्‍मीरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानी जवानांकडून अलिकडच्या काळात सातत्याने गोळीबार केला जात आहे. दोन दिवसात भारताचे पाच जवान शहीद झाले तर सहा नागरिकांचा मृत्यू झाला. सीमेवर प्रचंड तणाव वाढल्यामुळे परिसरातील 300 शाळा पुढील तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेजवळील सुमारे 20 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.  लष्कराच्या 100च्या वर गाड्या; अॅम्ब्युलन्स जम्मू, सांबा, पूंछ, कथुआ, राजौरी या जिल्हय़ांतील सीमेलगतची शेकडो गावे रिकामी केली आहेत. पाकडय़ांच्या हल्ल्यामुळे अनेकांच्या घरांचे, वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. या गावांमधील 10 हजारांवर नागरिकांना लष्कराने, बीएसएफने सुरक्षितस्थळी हालविले. नागरिकांना सुरक्षितस्थळी घेऊन जाण्यासाठी लष्कराने 100च्या वर वाहनांची सोय केली. जखमी नागरिकांना रुग्णालयात हलविण्यासाठी ऍम्ब्युलन्सही तयार ठेवण्यात आल्या. 

8 पाकिस्तानी रेंजर्स ठार प्रत्युत्तराच्या कारवाईत भारतीय सेनेनं सांबा, आरएसपुरा आणि हीरानगर सेक्टर परिसरात  पाकिस्तानचं प्रचंड नुकसान केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमारेषे पलिकडे  शकरगड आणि सियालकोट परिसरात आठ पाकिस्तानी नागरिक आणि रेंजर्स मारले गेले आहेत.  

पाकिस्तानला धडा शिकवा, बीएसएफच्या महासंचालकांचा आदेशभारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव पाहता सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या कुरापतींचा सर्व शक्तीनिशी बदला घेत पाकिस्तानला धडा शिकवावा, असे आदेश सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी बीएसएफच्या जवानांना दिले आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवरील स्थिती तणावपूर्ण आहे. नियंत्रण रेषेलगत गोळीबार केल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या नागरी वस्त्या आणि भारतीय लष्कराच्या सीमा चौक्यांना लक्ष्य केले. पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबारात शहीद झालेले जवान ए. सुरेश यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर महासंचालक शर्मा म्हणाले की, बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल ए. सुरेश यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. पाकिस्तानी रेंजर्सनी झाडलेली एक गोळी सीमेवरील खंदकातील निमुळत्या खिंडारातून पार होत या जवानाला लागली. पाकिस्तानच्या बाजूनेच वारंवार भारतीय हद्दीत विनाकारण गोळीबार आणि उखळी तोफांचा भडिमार केला जातो. तथापि, आम्ही दरवेळी पलटवार करून या अगोचरपणाचा बदला घेत असतो, असे शर्मा म्हणाले.  

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी