शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जवानांवर हल्ला करणाऱ्या नक्षल्यांना सोडणार नाही- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 15:43 IST

महाराष्ट्र दिनीच कुरखेड्यापासून 6 किलोमीटर अंतरावर जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला.

नवी दिल्ली- महाराष्ट्र दिनीच महाराष्ट्रातल्या गडचिरोलीतल्या कुरखेड्यापासून 6 किलोमीटर अंतरावर जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात नक्षलींनी जवानांची गाडी उडवून दिली, या हल्ल्यात 16 जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.पंतप्रधान म्हणाले, सर्वच शूरवीर जवानांना मी सलाम करतो. त्यांचं बलिदान कधीही विसरता येणारं नाही. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सामील आहे. जवानांचं वाहन घातपात करून उडवून देणाऱ्या 'त्या' नक्षलवाद्यांना सोडणार नसल्याचंही मोदींनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे.गडचिरोली सी-60 पथकाचे 16 जवान शहीद झाले आहेत. शहिदांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. मी राज्यातील डीजीपी आणि गडचिरोलीच्या एसपींच्या संपर्कात असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत असताना गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी काल मध्यरात्री मोठ्या प्रमाणात जाळपोळ करून धुमाकूळ घातला होता.छत्तीसगड सीमेकडील भागात सशस्त्र नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील 27 पेक्षा जास्त वाहने आणि डांबर प्लांटला आग लावली. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. ही घटना कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे मध्यरात्रीपासून पहाटे 3.30 दरम्यान घडली.

त्यानंतर आज कुरखेड्यापासून 6 किलोमीटर अंतरावर नक्षलवाद्यांच्या जाळपोळीनंतर बंदोबस्तासाठी कुरखेडा येथून टाटा एस या मालवाहू वाहनाने जवानांचं पथक जात असताना नक्षलवाद्यांनी त्यांना लक्ष्य केलं. नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात क्यूआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम)चे 16 जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी