शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ना खाऊंगा ना खाने दूंगा, जय शहाने भरपूर खाल्ले त्याबद्दल काहीतरी बोला मोदी - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 16:22 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही म्हणाला होता ना खाऊंगा ना खाने दूंगा, जय शहाने भरपूर खाल्ले त्याबद्दल काहीतरी बोला.

ठळक मुद्देजय शहाच्या कंपनीने इतक्या वेगाने कशी प्रगती केली ? असा सवाल राहुल गांधींनी गांधीनगर येथील सभेत विचारला.

गांधीनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही म्हणाला होता ना खाऊंगा ना खाने दूंगा, जय शहाने भरपूर खाल्ले त्याबद्दल काहीतरी बोला. जय शहाबद्दल एक ओळ तरी बोला मोदी, अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला. मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया या मोदी सरकारने सुरु केलेल्या योजना अपयशी ठरल्या पण एका कंपनीने रॉकेटच्या स्पीडने प्रगती केली. 

ती म्हणजे जय शहाची कंपनी. जय शहाच्या कंपनीने इतक्या वेगाने कशी प्रगती केली ? असा सवाल राहुल गांधींनी गांधीनगर येथील सभेत विचारला. वर्षअखेरीस होणा-या विधानसभा निवडणुकीआधी गुजरातमध्ये राजकीय रण पेटले असून, भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा खेळ रंगला आहे. अल्पेश ठाकोर, जिगनेश मेवानी, हार्दिक पटेल यांनी दाखवून दिले गुजरात शांत बसणार नाही. 

तुम्ही गुजरातचा आवाज दाबू शकत नाही तसेच तो खरेदीही करु शकत नाही असे राहुल गांधी म्हणाले. महात्मा गांधी, सरदार पटेल या गुजरातच्या आवाजाने महासत्तेला देशातून पळवून लावले आहे हे लक्षात ठेवा. मागच्या 22 वर्षांपासून गुजरातमध्ये लोकांचे सरकार नव्हते. पाच ते दहा उद्योगपतींचे सरकार होते असा आरोप राहुल यांनी केला. गुजरातच्या जनतेला नोकरी, चांगले शिक्षण हवे आहे. पण भाजपा सरकार या गोष्टी जनतेला देण्यात अपयशी ठरली आहे असे राहुल गांधी म्हणाले. जेव्हा तुम्ही सेल्फी घेण्यासाठी बटण क्लिक करता तेव्हा चीनमधल्या युवकाला रोजगार मिळतो असे राहुल म्हणाले. 

मुख्यमंत्री असताना गुजरातच्या विकासासाठी किती संघर्ष करावा लागला ते मलाच माहित मोदींनी रविवारी भावनगरमध्ये रो-रो सेवेचे उदघाटन करताना  काँग्रेसवर जोरदार टीका केली. 2014 च्या आधी केंद्रात सतेवर असलेल्या काँग्रेसने गुजरातचा विकास रोखण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न केला असा आरोप केला.  वापी ते कच्छच्या मांडवीपर्यंत विकास रोखण्यात आला. उद्योग पर्यावरणाच्या नावाखाली बंद करण्याची धमकी दिली. विकासाला टाळ लावण्याची धमकी दिली. मी मुख्यमंत्री असताना गुजरातच्या विकासासाठी मला किती संघर्ष करावा लागला ते मलाच माहित आहे असे मोदी म्हणाले. 

टॅग्स :GujaratगुजरातRahul Gandhiराहुल गांधी