शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पितृपक्षात तरी गुन्हे करू नका, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांची गुन्हेगारांना हात जोडून विनवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 05:25 IST

बिहारमधील गुन्हेगारीला आळा घालण्यात अपयश आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी किमान पितृपक्षात तरी गुन्हे करू नका, अशी विनवणी

- ए. पी. सिन्हापाटणा  -  बिहारमधील गुन्हेगारीला आळा घालण्यात अपयश आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी किमान पितृपक्षात तरी गुन्हे करू नका, अशी विनवणी राज्यातील गुन्हेगारांना करताना, त्यासाठी मी तुमच्यापुढे हात जोडतो, असे वक्तव्य केल्याने विरोधकांना टीकेसाठी आयतीच संधी मिळाली आहे.बिहारमधील गया येथे दरवर्षी पितृपक्ष मेळा भरतो. देशभरातील लाखो लोक त्यावेळी तिथे पिंडदानासाठी येतात. त्या मेळ्याच्या उद्घाटनासाठी सुशीलकुमार मोदी तिथे गेले होते. तिथे गुन्हेगारांना उद्देशून उपमुख्यमंत्री म्हणाले की, तुम्ही एरवी गुन्हे करीतच असता. आम्ही गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले तरी तुमचे गुन्हे सुरूच राहतात. आता किमान पितृपक्षामध्ये तरी गुन्हे करू नका, अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंतीआहे.गया येथे देशभरातून जे लोक पिंडदानासाठी येतात, त्यांना लुबाडणे, त्यांच्या वस्तू वा पैसा लुटणे, त्यांना धमकावणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात. बिहारचे नाव देशात आणखी बदनाम करू नका, असे सांगताना ते म्हणाले की, १५ दिवस चालणाऱ्या हिंदूंच्या या धार्मिक कार्यक्रमात तरी तुम्ही कृपाकरून काही करू नका. परराज्यांतून आलेल्या एकाही व्यक्तीकडून गुन्हेगारी, गुंडगिरीची तक्रार येऊ नये, अशी सरकारची इच्छा आहे.आता पायाही पडा : तेजस्वी यादवसुशीलकुमार मोदी यांच्या या विनवणीमुळे राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसने नितीशकुमार सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.बिहारमधील सत्ताधारी आता गुन्हेगारांनाच विनवण्या करू लागले आहेत, आता गुन्हेगारांच्या पाया पडणे तेवढे सरकारने बाकी ठेवले आहे, अशी टीका राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केली.गुन्हेगारांकडे याचना करणारे सरकार बिहारच्या जनतेने याआधी कधीही पाहिले नव्हते, असा टोला काँग्रेसनेही लगावला आहे.

टॅग्स :Biharबिहारnewsबातम्या