शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Karunanidhi Death Update : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके प्रमुख एम. करुणानिधी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 06:06 IST

Karunanidhi Death Update : डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे आज संध्याकाळी निधन झाले. 

चेन्नई - सुमारे सहा दशकांपासून तामिळनाडू आणि देशाच्या राजकारणावर आपला ठसा उमटवणारे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे मंगळवारी संध्याकाळी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी संध्याकाळी 6 वाजून दहा मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. करुणानिधींच्या निधनामुळे त्यांचे तामिळनाडूमधील समर्थक शोकसागरात बुडाले आहेत.

3 जून 1924 रोजी जन्मलेल्या मुत्तुवेल करुणानिधी यांनी तामिळनाडूच्या राजकारणावर प्रदीर्घकाळ आपला ठसा उमटवला होता. करुणानिधी यांनी 1949 साली अण्णादुराई यांच्याबरोबर द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाची स्थापना केली आणि ते त्या पक्षाचे पहिले कोषाध्यक्ष झाले. 1957 साली द्रमुकने तामिळनाडू विधानसभेची पहिली निवडणूक लढवली आणि पक्षाचे 13 सदस्य विधानसभेत निवडून गेले. त्यामध्ये करुणानिधी यांचा समावेश होते. ते कुलीतलाईमधून मतदारसंघातून निवडणूक लढले होते. त्यानंतर त्यांनी 12 वेळा विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते नेहमीच विजयी होत राहिले.  1969 साली डीएमके पक्षाचे प्रमुख एन. अण्णादुराई यांचे निधन झाल्यानंतर करुणानिधी यांनी डीएमकेचे अध्यक्षपद स्वीकारले होते. तेव्हापासून अखेरपर्यंत त्यांनी डीएमकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. यादरम्यान पाचवेळा त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद सांभाळले.करुणानिधी यांनी तामिळ चित्रपट सृष्टीमधील एक पटकथा लेखक म्हणून कारकीर्दीस प्रारंभ केला होता. तसेच आपली बुद्धिमत्ता आणि वकृत्वकौशल्याच्या जोरावर ते लवकरच कुशल राजकारणी बनले. द्रविड आंदोलनामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. जस्टिस पार्टीचे के. अलगिरिस्वामी यांच्या एका भाषणावर प्रभावित होऊन करुणानिधी यांनी वयाच्या 14 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला होता. तसेच तामिळनाडूत सुरू झालेल्या हिंदीविरोधी आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी आपल्या भागातील तरुणांसाठी एका संघटनेची सुद्धा स्थापना केली होती.  प्रतिभावंत असलेल्या करुणानिधी यांचे तामिळ भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी अनेक पुस्तके, कादंबऱ्या, नाटके आणि अनेक तामिळ चित्रपटांचे संवाद लेखन केले होते. चित्रपट सृष्टीमधून राजकारणात उतरल्यानंतर आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी एकाही निवडणुकीत पराभव स्वीकारला नव्हता. तामिळनाडूमधील त्यांचे समर्थक त्यांना कलाईनार अर्थात कलेचा विद्वान म्हणून संबोधत असत.  

टॅग्स :Karunanidhiकरुणानिधीnewsबातम्याTamilnaduतामिळनाडूKarnatakकर्नाटक