शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोर आमदारांच्या भेटीस आलेल्या शिवकुमार यांना पुन्हा बंगळुरूला पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 21:56 IST

बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी आलेल्या शिवकुमार यांना आज दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

मुंबई - मुंबईतील पवईमध्ये असलेल्या रेनेसन्स हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या काँग्रेस आमदारांच्या भेटीला आलेले काँग्रेसचे कर्नाटकमधील नेते डी.के. शिवकुमार यांची बंगळुरूला रवानगी करण्यात आली आहे. बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी आलेल्या शिवकुमार यांना आज दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.   कर्नाटकातील सत्ता संघर्षामध्ये मुंबईतील पवईमध्ये असलेले रेनेसन्स हॉटेल केंद्रबिंदू ठरले आहे. काँग्रेस-जनता दलाचे (एस)बंडखोर आमदार रेनेसन्स हॉटेलमध्ये थांबले आहेत. या बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी काँग्रसचे 'संकटमोचक' म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ नेता डीके शिवकुमार या ठिकाणी आले होते. त्यांना हॉटेलमध्ये पोलिसांनी जाऊ दिले नाही. त्यामुळे याठिकाणी तवाणाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर शिवकुमार यांना ताब्यात घेण्यात आले होते.  बंडखोर आमदारांसोबत चर्चा करण्यासाठी डीके शिवकुमार आज सकाळी मुंबईत आले होते. मात्र त्यांना भेटण्यास या आमदारांनी नकार दिला होता. तसेच, या आमदारांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून सुरक्षा मागविली होती. त्यामुळे पोलिसांकडून डीके शिवकुमार यांना हॉटेलमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली होती. तरीही सकाळपासून बंडखोर आमदारांची भेट घेण्यासाठी ते प्रयत्न करत होते. त्यामुळे डीके शिवकुमार यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि नसीम खान यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणMumbaiमुंबई