शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

72 हजार कोटींची दिवाळीनिमित्त खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 05:12 IST

Diwali : नागरिकांचा उत्साह : बाजारपेठेतील मरगळ झाली दूर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिवाळीच्या उत्साहाने कोरोना चिंतेला मागे टाकले असून, बाजारातही मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याची नोंद आहे. दिवाळीच्या दिवसांत ७२ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (सीएआयटी) दिली आहे. विशेष म्हणजे चिनी वस्तूंना यंदा बाजारात प्रवेशच देण्यात आला नव्हता. 

सीएआयटीने दिलेल्या माहितीनुसार देशभरातील २० शहरांतून झालेल्या खरेदी-विक्रीच्या आकडेवारीतून दिवाळीच्या दिवसांत ७२ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे नोंदवले गेले आहे. एरवी दिवाळीच्या निमित्ताने बाजारात चीननिर्मित अनेक वस्तूंची रेलचेल असते; परंतु यंदा चिनी वस्तूंना बाजारात प्रवेश द्यायचा नाही, असे सर्व व्यापाऱ्यांनी ठरवले होते. त्यानुसार केवळ भारतीय बनावटीच्या वस्तूंचीच विक्री देशभरात झाली. या उलाढालीमुळे चीनचे ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

देशातील मोठ्या शहरांत झाले सर्वेक्षणदिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठेत किती उलाढाल होते यासाठी सीएआयटीतर्फे दिल्लीसह मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, नागपूर, रायपूर, भुवनेश्वर, रांची, भोपाळ, लखनौ, कानपूर, नोएडा, जम्मू, अहमदाबाद, सुरत, कोचीन, जयपूर आणि चंदीगड या शहरांत सर्वेक्षण करण्यात आले. गृहोपयोगी वस्तू, खेळणी, चपला, कपडे, मिठाई, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गृह सजावटीच्या वस्तू, घड्याळे, फर्निचर इत्यादींची विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले. ७२ हजार कोटी रुपयांची उलाढाल यातून झाली, असे सीएआयटीने नमूद केले आहे.  

टॅग्स :Diwaliदिवाळी