शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फळवाल्याची मुलगी, गँगस्टरची गर्लफ्रेंड, B.Com ड्रापऑउट...; कोण होती मॉडेल दिव्या पाहुजा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 11:21 IST

Divya Pahuja Murder Case : दिव्याच्या कुटुंबात एक लहान बहीण आणि आई-वडील आहेत.

27 वर्षीय मॉडेल दिव्या पाहुजाची हरियाणातील गुरुग्राममध्ये हत्या करण्यात आली. दिव्या पाहुजाची एका हॉटेलमध्ये हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह नेण्यात येत होता. यावेळी पोलिसांनी आरोपी हॉटेल मालकासह अन्य दोन साथीदारांना अटक केली आहे.

दिव्या पाहुजा ही हरियाणातील गुरुग्राममधील बलदेव सिंह नगर येथील रहिवासी होती. दिव्या तिच्या गँगस्टर बॉयफ्रेंडच्या मुंबईतील एन्काऊंटरमध्ये आरोपी होती. गँगस्टर संदीप गडोलीची 7 फेब्रुवारी 2016 रोजी मुंबईतील एका हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली होती.

कोण होती दिव्या पाहुजा?

गुरुग्रामच्या बलदेव नगरमध्ये राहणारी दिव्या पाहुजा हिची गँगस्टर संदीप गडोलीसोबत मैत्री होती. दिव्याने बी.कॉममध्ये शिकण्यासाठी प्रवेशही घेतला होता आणि याच दरम्यान तिने मॉडेलिंगला सुरुवात केली होती. दिव्याचे वडील दिव्यांग असून ते भाजीपाला आणि फळे विकण्याचं काम करतात. 

दिव्याच्या कुटुंबात एक लहान बहीण आणि आई-वडील आहेत. दिव्या 18 वर्षांची असताना तिला 2016 मध्ये अटक करण्यात आली होती. आता 2023 मध्ये ती सात वर्षांनी तुरुंगातून बाहेर आली. गँगस्टरच्या हत्येप्रकरणी दिव्याच्या आईलाही अटक करण्यात आली होती.

का झाली हत्या? 

दिव्या पाहुजा हिची आरोपी हॉटेल मालक अभिजीत सिंहसोबत मैत्री होती. 2 जानेवारी रोजी आरोपी अभिजीत सिंह दिव्या पाहुजासोबत हॉटेल सिटी पॉइंटमध्ये आला होता.  दिव्याच्या फोनमधून त्याचे अश्लील फोटो डिलीट करायचे होते, मात्र दिव्याने त्याला फोनचा पासवर्ड सांगितला नाही. 

रागाच्या भरात आरोपी अभिजीतने दिव्या पाहुजाची गोळ्या झाडून हत्या केली. नंतर हॉटेलमध्ये साफसफाई आणि रिसेप्शनचे काम करणारे हेमराज आणि ओमप्रकाश यांच्यासह मृतदेह बीएमडब्ल्यू कारमध्ये ठेवण्यात आला. यानंतर आरोपी अभिजीतने त्याच्या इतर दोन साथीदारांना बोलावून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कार दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी