शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

पतीला भित्रा किंवा बेरोजगार म्हणाल तर घटस्फोट! आई वडिलांपासून वेगळे करणे ही एक क्रूरताच : न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 04:32 IST

पत्नीने आपल्या पतीला भित्रा किंवा बेरोजगार म्हणणे ही मानसिक क्रूरता आहे. घटस्फोटासाठी हा एक मजबूत आधार असू शकतो, असे निरीक्षण कोलकाता उच्च न्यायालयाने एका निकालात नोंदवले आहे.

कोलकाता :

पत्नीने आपल्या पतीला भित्रा किंवा बेरोजगार म्हणणे ही मानसिक क्रूरता आहे. घटस्फोटासाठी हा एक मजबूत आधार असू शकतो, असे निरीक्षण कोलकाता उच्च न्यायालयाने एका निकालात नोंदवले आहे. जर महिलेने पतीवर आईवडिलांपासून वेगळे राहण्यासाठी दबाव आणला तर हेही घटस्फोटाचे कारण ठरेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

न्यायमूर्ती सौमेन सेन आणि न्यायमूर्ती उदय कुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, भारतीय कुटुंबांमध्ये मुलगा लग्नानंतर आईवडिलांसोबत राहतो. जर त्याची पत्नी त्याला त्याच्या पालकांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यामागे काही योग्य कारण असायला हवे. 

पत्नीने केलेल्या क्रूरतेच्या कारणावरून पतीला कौटुंबिक न्यायालयाने २००९ मध्ये घटस्फोट मंजूर केला होता. या आदेशाला पत्नीने आव्हान देत न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर खंडपीठात सुनावणी सुरू होती.

खंडपीठाने म्हटले की, घरगुती मुद्द्यांवर अहंकाराचा संघर्ष आणि या प्रकरणात आर्थिक गरजा पूर्ण करण्याशी संबंधित समस्यांव्यतिरिक्त, पत्नीने पतीला विभक्त होण्यासाठी कोणतेही समाधानकारक कारण नाही. या प्रकरणात पत्नीच्या छळाला कंटाळून मुलगा आईवडिलांना सोडून भाड्याच्या घरात राहायला गेला होता.पत्नी अतिशय भांडखोर पतीचे म्हणणे असे होते की, त्याची पत्नी त्याला भित्रा आणि बेरोजगार म्हणते तसेच अगदी क्षुल्लक गोष्टीवरून भांडण करत राहते. याच वेळी ती त्याला त्याच्या आईवडिलांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत होती. खंडपीठाने पत्नीच्या असभ्य वर्तनाच्या अनेक उदाहरणांचा उल्लेख केला. ज्यामध्ये पती आणि त्याच्या आईवडिलांसोबत ती सतत भांडण करत होती.तो पतीला अधिकार...खंडपीठाने म्हटले की, भारतीय संस्कृतीत आईवडील आणि मुलांचे नाते अत्यंत पवित्र आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती आणि समाजात प्रचलित असलेल्या प्रथांनुसार मुलाने आपल्या पालकांची काळजी घेणे स्वाभाविक आहे. परंतु, जर मुलाच्या लग्नानंतर त्याची पत्नी सामाजिक प्रथा किंवा नियम मोडून मुलाला असहाय पालकांच्या कुटुंबापासून दूर नेत असेल किंवा त्याला इतरत्र राहण्यास भाग पाडत असेल तर अशा पत्नीला घटस्फोट देण्याचा पतीला अधिकार आहे. कारण, ते आपल्या समाजाच्या नियमित प्रथेच्या विरोधात आहे.

टॅग्स :Courtन्यायालय