शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

"मन अस्वस्थ, त्यांना मायदेशी परत आणा"; भज्जीची मोदी सरकारला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 13:40 IST

कतारच्या न्यायालयाने भारताच्या ८ माजी अधिकाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्याचे वृत्त मन अस्वस्थ करणारे आहे.

दोहा/कतार : कतारमधीलन्यायालयाने आठ माजी भारतीय नौसैनिकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. ते गेल्या एक वर्षापासून तुरुंगात कैद आहेत. ही शिक्षा अत्यंत धक्कादायक असून, त्यांची सुटका करण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधले जात आहेत, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. आठ भारतीयांवर नेमके काय आरोप आहेत, हे कतार सरकारने सार्वजनिक केलेले नाहीत. या घटनेवरुन आता देशातील मान्यवरांनी केंद्र सरकारकडे अधिकाऱ्यांच्या सुटकेची मागणी केली आहे. खासदार आणि टीम इंडियाचा माजी गोलंदाज हरभजनसिंग यानेही मोदी सरकरला विनंती केली आहे. 

कतारच्या न्यायालयाने भारताच्या ८ माजी अधिकाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्याचे वृत्त मन अस्वस्थ करणारे आहे. भारत सरकारला माझी विनंती आहे की, सरकारने सर्व पर्यायांचा शोध घेऊन त्या माजी अधिकाऱ्यांना परत मायदेशी आणावे. त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे, असे हरभजनसिंगने म्हटले आहे. भज्जीने ट्विट करुन सरकारकडे ही विनंतीपर मागणी केली आहे.   कतारच्या गुप्तचर संस्थेच्या राज्य सुरक्षा ब्युरोने ३० ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांना अटक केली. मात्र, सप्टेंबरच्या मध्यात भारतीय दूतावासाला अटकेची माहिती देण्यात आली होती. ३० सप्टेंबर रोजी त्यांना आपल्या कुटुंबांसोबत काही वेळ फोनवर बोलण्याची परवानगी दिली नव्हती. भारतीय नौदलाचे हे माजी अधिकारी इस्रायलसाठी त्यांच्या देशाची हेरगिरी करत असल्याचा दावा कतारच्या स्थानिक माध्यमांनी केला आहे. मात्र, यात किती तथ्य आहे हे समोर आले नाही. 

‘ते’ आठ अधिकारी नेमके कोण?

कतारमध्ये ज्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यांच्यामध्ये कॅप्टन नवतेजसिंग गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर सुगनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि नाविक रागेश यांचा समावेश आहे.

भारत सरकारचे म्हणणे काय?

कतारच्या कनिष्ठ कोर्टाने अल दाहरा कंपनीच्या आठ भारतीय कर्मचाऱ्यांशी संबंधित खटल्यात आपला हा निर्णय दिला आहे. आम्ही कुटुंबातील सदस्य आणि कायदेशीर टीमच्या संपर्कात आहोत. आम्ही सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करत आहोत, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

टॅग्स :Harbhajan Singhहरभजन सिंगGovernmentसरकारBJPभाजपाCourtन्यायालयQatarकतार