शहरात दीड लाखाचा गुटखा जप्त शहरातील पानटपर्या लक्ष्य : अन्नसुरक्षा विभागाची कारवाई
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
सोलापूर: अन्न व औषध प्रशासन विभागाने आता शहरातील पानटपर्यांवर लक्ष केंद्रित केले असून, एकाच वेळी धाडी टाकून गुटखा जप्त करण्यात आला. धडक कारवाईत एक लाख 54 हजार 134 रुपयांचा गुटखा सापडला.
शहरात दीड लाखाचा गुटखा जप्त शहरातील पानटपर्या लक्ष्य : अन्नसुरक्षा विभागाची कारवाई
सोलापूर: अन्न व औषध प्रशासन विभागाने आता शहरातील पानटपर्यांवर लक्ष केंद्रित केले असून, एकाच वेळी धाडी टाकून गुटखा जप्त करण्यात आला. धडक कारवाईत एक लाख 54 हजार 134 रुपयांचा गुटखा सापडला.मागील दोन महिन्यांपासून अन्न व औषध प्रशासनाने हॉटेल तपासणी, गुटखा जप्ती तसेच भेसळयुक्त दूध विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. यामध्ये अस्वच्छ हॉटेलचालकांवर कारवाई केली जात आहे. शेजारच्या राज्यातून विक्रीसाठी येणारा गुटखाही मोठय़ा प्रमाणावर पकडला आहे. आता तर पानटपर्यांमध्ये राजरोसपणे विक्री सुरू असलेल्या गुटख्यावर धाडी टाकल्या आहेत. सोलापूर शहरातील 22 पानविक्रीच्या टपर्यांमध्ये विक्रीसाठी ठेवलेला गुटखा जप्त करण्यात आला. डोंगरे पानशॉप नवीपेठ, चाचा पानशॉप किडवाई चौक, ओम जनरल स्टोअर्स विजापूर रोड, समीर किराणा सिद्धेश्वर पेठ, अजीज पानशॉप सिद्धेश्वर पेठ, तांबोळी पानशॉपमधला मारुती, सादिक पान सिद्धेश्वर पेठ, धानेश्वरी पानशॉप गुरुवार पेठ, महादेवी पानशॉप मुरारजी पेठ, सिद्धेश्वर पानशॉप जुळे सोलापूर, अमृततुल्य पानशॉप शिवाजी चौक, नायब पानशॉप पेंटर चौक, मुस्कान पानशॉप सिद्धेश्वर पेठ, तांबोळी पानशॉपमधला मारुती, इंडिया पानशॉप सात रस्ता, वैष्णवी पानशॉप जुळे सोलापूर, अन्सारी पानशॉप, लोकप्रिया पानशॉप जुळे सोलापूर, बंदगी पानशॉप सिद्धेश्वर पेठ, स्वामी सर्मथ पानशॉप जुळे सोलापूर या ठिकाणी धाडी टाकून विक्रीसाठी ठेवलेला एक लाख 54 हजार 134 रुपयांचा गुटखा जप्त केला. अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे, सुरेश तोरेम, रेणुका पाटील(सर्व सोलापूर), गणपतराव कोकणे, महिंद्र पाटील (कोल्हापूर), इम्रान हवालदार,उदय लोहकरे(सातारा), विजय उनवणे, सचिन आढाव(पुणे), राहुल खंडागळे, रोहन शहा (सांगली) आदींनी ही कारवाई केली. शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चौकटबाहेरचे अधिकारी मागविलेशहर व जिल्?ातील पानटपर्यांवर मोठय़ा प्रमाणावर राजरोसपणे गुटखा विक्री केली जात असला तरी अन्न सुरक्षा अधिकार्यांची संख्या कमी असल्याने कारवाईची अडचण आहे. ही बाब लक्षात घेऊन धाडी टाकण्यासाठी शेजारच्या जिल्?ातील अन्न सुरक्षा अधिकार्यांना बोलावले होते. यामुळे एकाच वेळी 22 ठिकाणी धाडी टाकता आल्याचे सांगण्यात आले.कोटगुटखा व अन्य भेसळयुक्त ठिकाणी धाडी टाकण्यासाठी यापुढेही शेजारच्या जिल्?ातून अन्न सुरक्षा अधिकारी बोलावले जातील. शासनाने बंदी घातलेला गुटखा साठा जप्त केला जाईल.किशोर गोरेसहायक आयुक्त(अन्न )