शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार जिल्हा सरकारी रुग्णालयं देणार खासगी संस्थांच्या हाती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 06:35 IST

केंद्र सरकारचा विचार; नीति आयोगाने सादर केला २५० पानी आराखडा

नवी दिल्ली : जिल्हा सरकारी रुग्णालये खासगी संस्थांना चालवायला देण्याची मोठी योजना केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. वैद्यकीय महाविद्यालये व वैद्यकीय जागा वाढविण्याच्या उद्देशानेही ही योजना आखण्यात आली आहे. जिल्हा सरकारी रुग्णालये खासगी संस्थांशी संलग्न करून तेथे वैद्यकीय महाविद्यालये चालविली जाऊ शकतील. ही वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याची व चालविण्याची जबाबदारीही खासगी संस्थांकडे सोपविली जाऊ शकते.केंद्र सरकारची सर्वोच्च सल्लागार संस्था नीति आयोगाने या योजनेचा २५० पानांचा आराखडा जारी केला आहे. ‘पीपीपी पद्धतीने नवी वाजुनी खासगी वैद्यकीय महाविद्यालये सक्रिय जिल्हा रुग्णालयांशी संलग्न करण्याची योजना’ असे या अहवालाचे नाव आहे. हा अहवाल प्रतिक्रियांसाठी सर्व हितधारकांना (स्टेकहोल्डर्स) खुला करण्यात आला आहे. या मुद्द्याशी संबंधित असलेल्या हितधारकांची बैठक याच महिन्यात होणार आहे.अहवालानुसार, खासगी संस्थांशी संलग्न होणारी जिल्हा सरकारी रुग्णालये किमान ७०० खाटांची असतील. या रुग्णालयांचे नियंत्रण खासगी संस्थांकडे असेल. यातील निम्म्या बेडवरील रुग्णांकडून बाजार खर्चाप्रमाणे रक्कम आकारण्यात येईल. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून उरलेल्या निम्म्या बेडवरील रुग्णांना कमी खर्चात उपचार केले जातील. अहवालात म्हटले आहे की, भारतात वैद्यकीय शिक्षणाची मोठी तूट आहे. मर्यादित साधने व वित्तीय अडचणी, यामुळे ही तूट भरून काढणे केंद्र व राज्य सरकारांना शक्य नाही. वैद्यकीय जागा वाढणे आवश्यक आहे, तसेच वैद्यकीय शिक्षणाचा खर्चही व्यवहार्य असणे आवश्यक आहे. सरकार-खासगी भागीदारीतून (पीपीपी) ही गरज पूर्ण केली जाऊ शकते.संस्थांनीच करावे बांधकामया योजनेनुसार, खासगी संस्था वैद्यकीय महाविद्यालये स्वखर्चाने बांधून चालवतील. या महाविद्यालयाला जिल्हा रुग्णालये जोडली जातील. ही रुग्णालयेही खासगी संस्थांकडूनच चालविली जातील.