शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

15 ऑगस्ट दिनी महाराष्ट्र कन्येला बहुमान, सेलमच्या जिल्हाधिकारी जगभर झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 18:32 IST

सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील कन्या आणि तामिळनाडूतील सेलमच्या जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे

ठळक मुद्दे'द ग्रेट इंडियन इलेक्शन' या माहितीपटाद्वारे देशातील निवडणूक प्रक्रियेची माहिती जगाला दाखविण्यात येणार आहे.सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील कन्या आणि तामिळनाडूतील सेलमच्या जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे

मुंबई - 'नॅशनल जिओग्राफी' या वृत्तवाहिनीवरुन 15 ऑगस्ट रोजी भारतीय लोकशाहीच्या निवडणुक प्रक्रियेची माहिती जगाला दाखवण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातील निवडणूक प्रक्रिया आणि त्याची अंमलबजावणी कशी होते, याबाबतचा एक माहितीपट या वृत्तवाहिनीवरुन जगाला दाखवण्यात येणार आहे. 

'द ग्रेट इंडियन इलेक्शन' या माहितीपटाद्वारे देशातील निवडणूक प्रक्रियेची माहिती जगाला दाखविण्यात येणार आहे. या माहितीपटाद्वारे जगाला आपली निवडणूक प्रक्रिया समाजावून सांगण्यासाठी देशातून दोन आयएएस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र कन्येला संधी मिळाली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील कन्या आणि तामिळनाडूतील सेलमच्या जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे यांची या निवेदनासाठी निवड झाली आहे. तर, दुसरे आयएएस अधिकारी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुरेंद्र सिंग असणार आहेत. 

सेलम जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून रोहिणी भाजीभाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी बनून काम पाहिलं. त्याचा आपणास अभिमान वाटतो, तर देशातील निवडणूक प्रक्रिया जगाला समाजावून सांगण्याची संधी मिळणे ही सेलम जिल्ह्यातील कामाची पावती असल्याचे रोहिणी भाजीभाकरे यांनी म्हटले आहे. भारतात नुकतेच 17 व्या लोकसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. ईव्हीएम मशिनद्वारे देशातील 545 मतदारसंघात मतदान घेण्यात आले. कोट्यवधी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावत नवीन सरकार स्थापन केले. यावेळीही जनतेनं मोदींच्या नेतृत्वाला संधी दिली आहे. निवडणूक आयोगाने सरकारी कर्मचारी आणि देशातील सुरक्षा रक्षकांना सोबत घेऊन शांततेत आणि अतिशय सहजतेनं ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली. निश्चितच भारतासारख्या विशाल लोकसंख्या असलेल्या देशातील निवडणूक प्रकिया ही जगभरातील लोकांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. कारण, न्यूटन चित्रपटात दाखवलेल्या आदिवासी बहुल भागांपासून ते दिल्लीच्या हाय प्रोफाईल लोकांपर्यंत सर्वच मतदारांनी त्यादिवशी आपला मतदानाचा हक्क बजावला. सुरक्षा यंत्रणा, ईव्हीएम प्रणाली, व्हीपॅटपॅट प्रणाली, निवडणूक आयोगाची नियमावली, आचारसंहिता यांसह बारीकसारीक गोष्टींचे नियोजन या मतदानप्रक्रियेवेळी करावे लागते. त्यामुळेच, जगभरातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या निवडणूप्रकिया एक संशोधनाचा विषय आहे.      

टॅग्स :VaranasiवाराणसीElectionनिवडणूकTamilnaduतामिळनाडूSolapurसोलापूर