जिल्हा बॅँक अपहारप्रकरणी तिघांचे जामीन फेटाळले
By admin | Updated: April 25, 2016 00:27 IST
जळगाव : जे.टी.महाजन सुतगिरणी खरेदीसाठी भरलेली दोन कोटी ७९ लाख २८ हजार ७५० रुपये ही २५ टक्के रक्कम जप्त न करता लक्ष्मी टेक्सटाईल्सला परत करुन बॅँकेची फसवणुक व अपहार केल्याच्या दाखल गुन्ात धरणगाव येथील नगराध्यक्ष सुरेश सिताराम चौधरी (रा.धरणगाव)अनिल बन्सीलाल सोमाणी (रा.पाळधी, ता.धरणगाव) व भिकन काशिनाथ माळी (रा.पाळधी, ता.धरणगाव) या तिघांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहेत.
जिल्हा बॅँक अपहारप्रकरणी तिघांचे जामीन फेटाळले
जळगाव : जे.टी.महाजन सुतगिरणी खरेदीसाठी भरलेली दोन कोटी ७९ लाख २८ हजार ७५० रुपये ही २५ टक्के रक्कम जप्त न करता लक्ष्मी टेक्सटाईल्सला परत करुन बॅँकेची फसवणुक व अपहार केल्याच्या दाखल गुन्ात धरणगाव येथील नगराध्यक्ष सुरेश सिताराम चौधरी (रा.धरणगाव)अनिल बन्सीलाल सोमाणी (रा.पाळधी, ता.धरणगाव) व भिकन काशिनाथ माळी (रा.पाळधी, ता.धरणगाव) या तिघांचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहेत.आमदार सतीश पाटील यांच्यासह आठ जणांवर १९ एप्रिल रोजी रात्री जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितांच्या अटकेसाठी शोध मोहीम राबविल्यानंतर सुरेश चौधरी,सोमाणी व माळी यांनी शुक्रवारी ॲड.मोहन बी शुक्ला यांच्यामार्फत न्या.के.पी.नांदेडकर यांच्या न्यायालयत अटकपूर्व साठी अर्ज दाखल केला होता.