शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : राज्यांच्या लोकसंख्येनुसार लसींचे वाटप; नव्या मार्गदर्शक सूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 05:56 IST

Corona Vaccination : सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र सरकार लस उत्पादक कंपन्यांकडून राज्याच्या २५ टक्के हिश्श्यासह लसीचे  ७५ टक्के डोस खरेदी करील आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत देईल.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरण कार्यक्रमासंबंधी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र सरकार लस उत्पादक कंपन्यांकडून राज्याच्या २५ टक्के हिश्श्यासह लसीचे  ७५ टक्के डोस खरेदी करील आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत देईल. पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या भाषणात राज्यांना लस खरेदीसाठी खर्च करावा लागणार नाही, असे स्पष्ट केले होते.तथापि, सरकारने हेही स्पष्ट केले की,  राज्यांची लोकसंख्या आणि लस वाया जाण्याचे प्रमाण या घटकांवर  लसीचे वाटप अवलंबून असेल.  भारत सरकारकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना  संसर्गित होण्याचा दर आणि लसीकरणाची प्रगती  यासारख्या निकषांवर लसीचे मोफत डोस वाटप केले जातील.  लस वाया गेल्यास डोस वाटपावर नकारात्मक परिणाम होईल, असे अधिसूचनेत म्हटले आहे.देशांतर्गत लस उत्पादक कंपन्यांना खाजगी इस्पितळांना  लसीचा थेट पुरवठा करण्याचा पर्याय दिला जाईल आणि खाजगी इस्पितळांना सेवाशुल्क म्हणून किमान १५० रुपये आकारता येतील.किती डोसचा पुरवठा केला जाईल, हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अगोदरच सूचित केले जाईल. याचप्रमाणे राज्य जिल्हे आणि लसीकरण केंद्रांना डोसचे वाटप  करावेत. तसेच जिल्हा आणि लसीकरण केंद्रावर किती लस उपलब्ध आहे, याची माहिती  लोकांच्या सोयीसाठी प्रसारित करावी, असे मार्गदर्शन सूचनेत म्हटले आहे.

राज्यांनी ठरवावा प्राधान्यक्रम

-    केंद्राकडून वाटप केल्या  जाणाऱ्या डोसनुसार राज्यांना लसीकरणाचा प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. यात सर्वात अगोदर आरोग्यसेवा कर्मचारी असतील.त्यानंतर ४५ वर्षांवरील लोक आणि त्यानंतर दुसरा डोस घेणे बाकी असलेल्या लोकांना प्राधान्य दिले जावे.  त्यानंतर १८ वर्षांवरील लोक याप्रमाणे राज्यांनी प्राधान्यक्रम करावा.-    नवीन नियमानुसार सर्व नागरिकांना मोफत लस मिळेल, मग त्यांची आर्थिक स्थिती कशीही असो. तथापि, जे पैसे देऊ शकतात, अशा लोकांनी खाजगी इस्पितळातील लसीकरण केंद्रात पैसे देऊन लस घ्यावी.- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लोकांना खाजगी लसीकरण केंद्रात लस घेण्यासाठी ई-हस्तांतरीय असतील. ज्याच्या नावाने ई-कुपन जारी करण्यात आले आहे, त्याच व्यक्तीला याचा वापर करता येईल, असे नवीन मार्गदर्शक सूचनेत नमूद आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस