शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकांच्या तिकीट वाटपात, महिलांसाठी सर्वांनीच आखडला हात    

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 18:26 IST

महिलांना राजकारणात आरक्षण देण्याचा विषय चर्चेला आल्यास सर्वच पक्ष हात वर करुन पंसती दर्शवतात.

हैदराबाद - तेलंगणातीलविधानसभा निवडणुकांमध्ये तिकीट वाटपात महिलांना जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना तिकीट देताना आपला हात आखडता घेतला आहे. काँग्रेसकडून 100 उमेदवारांपैकी केवळ 11 महिलांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. तर तेलंगणा राष्ट्र समितीने केवळ चारच महिलांना निवडणुकांच्या रिंगणात उतरवले आहे. 

महिलांना राजकारणात आरक्षण देण्याचा विषय चर्चेला आल्यास सर्वच पक्ष हात वर करुन पंसती दर्शवतात. मात्र, प्रत्यक्षात तिकीट वाटपाची वेळ येते तेव्हा हेच हात मागे सरकतात. तेलंगणा विधानसभा तिकीट वाटपावेळीही असेच घडले आहे. तेलंगणा विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत 2014 साली टीआरएसने 6 महिलांना उमेदवारी दिली होती. मात्र, यंदा केवळ चारच महिलांना तिकीट देण्यात आले आहे. तर स्वतंत्रपणे निवडणूक लढविणाऱ्या भाजपाने 14 महिलांना उमेदवारी दिली आहे. तर हैदराबादच्या 8 जागांवर निवडणूक लढविणाऱ्या एमआयएमने एकही महिला उमेदवार दिला नाही. माकपाच्या नेतृत्वातील बहुजन लेफ्ट फ्रंटने 1 समलैंगिकसमवेत 10 महिलांना तिकीट दिले आहे. महिलांना तिकीट देण्याच्या मुद्द्याबाबत बोलताना काँग्रेसच्या स्टार प्रचारक खुशबू यांनी म्हटले की, संसदेत महिला आरक्षणाचे विधेयक आणण्यासाठी प्रयत्न करणारा काँग्रेस हा पहिला पक्ष आहे. मात्र, सत्तारुढ रालोआ हे विधेयक पारित करू इच्छत नाही. तर तेलंगणा भाजपच्या प्रमुख प्रवक्त्यांनी जागा वाटपात पक्षाकडून सामाजिक संतूलनाचा विचार करण्यात येत नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, काँग्रेस आघाडीतील तेलुगू देसम पक्षाने त्यांच्या वाट्यातील 14 पैकी एका जागेवर महिला उमेदवार उभा केला आहे. पण, त्याही मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या कन्या सुहासिनी याच आहेत. 

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018Telanganaतेलंगणाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकWomenमहिला