शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Parliamentary Award: लोकमत संसदीय पुरस्कारांचे उद्या दिल्लीत वितरण; माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 06:14 IST

दिल्लीतील संसद मार्गावरील एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये दुपारी साडेचार वाजता हा शानदार सोहळा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: लोकमत संसदीय पुरस्कारांच्या चौथ्या आवृत्तीचा (वर्ष २०२२) पुरस्कार वितरण समारंभ माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १४ मार्चला दिल्लीत होणार असून ते या समारंभाला मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

दिल्लीतील संसद मार्गावरील एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये दुपारी साडेचार वाजता हा शानदार सोहळा होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय लघु, माध्यम व सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे, काँग्रेसचे अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, राज्यसभेचे  उपसभापती हरीवंश नारायण सिंग, दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी उपस्थित राहणार आहेत.

लोकमत नॅशनल कॉनक्लेव्ह 

या पुरस्कार वितरण समारंभापूर्वी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळात ‘लोकमत नॅशनल कॉनक्लेव्ह’ आयोजित केला आहे. ‘भारतीय लोकशाही : परिपक्वतेच्या किती जवळ’ (इंडियन डेमोक्रसी : हाऊ क्लोझ टू मॅच्युरिटी) या विषयावर विविध राजकीय पक्षातील ज्येष्ठ नेते आपले विचार मांडणार आहेत. यात केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी, केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजीजू, केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अनुराग सिंग ठाकूर, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार दिग्विजय सिंग, सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी, भाजपचे खासदार सुधांशू त्रिवेदी, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी सहभागी होणार आहेत.

- सर्वाधिक विश्वासार्हतेचे प्रतिष्ठित लोकमत संसदीय पुरस्कार दरवर्षी आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये (चार लोकसभा व चार राज्यसभा) उत्कृष्ट संसद सदस्यांना त्यांच्या योगदानासाठी दिले जातात.

- विजेत्यांची निवड करण्यासाठी सर्व खासदारांच्या २०२० आणि २०२१ या वर्षातील संसदीय योगदानाचा ज्युरी बोर्डाने अभ्यास केला.

पुरस्काराचे मानकरीः मल्लिकार्जुन खरगे, भर्तृहरी महताब, असदुद्दीन ओवेसी, डेरेक ओ’ब्रायन, वंदना चव्हाण, तेजस्वी सूर्या, मनोजकुमार झा, लॉकेट चॅटर्जी.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्डRamnath Kovindरामनाथ कोविंद