शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

असंतुष्टांचा सोनिया गांधींवर विश्वास, राहुल, प्रियांकावर मात्र अविश्वास; वादाला कलाटणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 06:52 IST

महिन्यांपासून काँग्रेसमधील कलह समोर आले आहेत.

- सुरेश भुसारीनवी दिल्ली  : गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या काँग्रेसमधील कलहाला आज महत्त्वपूर्ण कलाटणी मिळाली. काँग्रेसमधील असंतुष्टाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी सायंकाळी भेट घेतली. सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे नेतृत्व करण्यास असंतुष्ट नेत्याचा विरोध नसून राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या वाढत्या प्रभावाला विरोध असल्याचे आज स्पष्ट झाले. याच मुद्यावर असंतुष्ट गटाची बाजू काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी यांच्यासमोर मांडली.

महिन्यांपासून काँग्रेसमधील कलह समोर आले आहेत. २०१९ मध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सोडल्यानंतर अद्यापही काँग्रेसला पूर्णवेळ काँग्रेस अध्यक्ष मिळालेला नाही. यामुळे काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागत असल्याचा दावा काँग्रेसमधील असंतुष्ट नेते करीत आहेत.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर राहुल व प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाच्या क्षमता पुन्हा अधोरेखित झाल्या. या मुद्यावरून गुलाम नबी आझाद यांनी आझाद यांनी या भेटीत सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर कुणाचाही अविश्वास स्पष्ट नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचे समजते.

असंतुष्टांचा विरोधअसंतुष्टांचा विरोध राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाला तसेच त्यांच्या भोवती असलेल्या नेत्यांना आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांची निवड तसेच  उत्तरप्रदेशात महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्याचा निर्णय कार्यकारिणीमध्ये चर्चा न करताच घेतल्याचे यावेळी सोनिया गांधी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. हे दोन्ही निर्णय काँग्रेसला महागात पडल्याचे स्पष्ट झाले.

संघटनात्मक निवडणुकांवरही चर्चाकाँग्रेस पक्षाने ब्लॉक स्तरापासून राष्ट्रीय पातळीपर्यंत संघटनात्मक निवडणुका घ्यावा, असा मुद्याही या चर्चेत आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस