शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूतल्या 18 बंडखोर आमदारांना मद्रास उच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 15:59 IST

अण्णा द्रमुकच्या 18 बंडखोर आमदारांची आमदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणा-या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयात सुनावणी झाली

चेन्नई- अण्णा द्रमुकच्या 18 बंडखोर आमदारांची आमदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणा-या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयात सुनावणी झाली असून, न्यायालय अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेलं नाही. या याचिकेवर सुनावणी करणा-या खंडपीठाच्या दोन्ही न्यायाधीशांची मतं वेगवेगळी आहेत.मद्रास उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांनी आमदारांना अयोग्य ठरवण्याच्या बाजूनं कल दिला. तर न्यायाधीश एम. सुंदर यांनी त्यांची आमदारकी रद्द करू नये, असा निर्णय दिला. त्यामुळे आता हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आलं आहे. न्यायालयाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत पोटनिवडणुका घेता येणार नसल्याचं मद्रास उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.या सर्व आमदारांना अण्णा द्रमुकचे बंडखोर नेते टीटीव्ही दिनाकरण यांना पाठिंबा दिल्याप्रकरणी त्यांना अयोग्य घोषित करण्यात आलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वातील अण्णा द्रमुक सरकारच्या स्थिरतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. जर न्यायालयानं आमदारांची आमदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला योग्य ठरवलं असतं तर सद्यस्थितीत अण्णा द्रमुकच्या सरकारला बहुमत सिद्ध करावं लागलं असतं. त्यामुळे के. पलानीस्वामी यांना आमदारांच्या संख्येची जुळवाजुळव करण्यात अडचणी आल्या असत्या. न्यायालयानं 23 जानेवारीलाच या प्रकरणावर निर्णय राखून ठेवला होता.तामिळनाडूत विधानसभेच्या 234 जागा आहेत. ज्यात एआयएडीएमकेजवळ 114 आणि डीएमकेजवळ 98 जागा आहेत. याशिवाय टीटीव्ही दिनाकरण स्वतः आमदार आहेत. त्यातील 18 आमदार असे आहेत की त्यांच्या नशिबाची चावी ही मद्रास उच्च न्यायालयाजवळ आहे. 18 सप्टेंबर 2017मध्ये तामिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष पी. धनपाल यांनी 18 एआयएडीएमकेच्या आमदारांची सदस्यता रद्द केली होती. एआयएडीएमकेच्या आमदारांनी राज्यपाल यांना भेटून पलानीस्वामी सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव मांडला होता. या पक्षाच्या प्रमुख एस. राजेंद्रनने अध्यक्षांविरोधात तक्रार केली आहे.