शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त न्या. सी. एस. कर्णन यांची अखेर सहा महिन्यानंतर सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 19:45 IST

न्यायालयीन अवमानाबद्दल सहा महिने तुरूंगवासाची शिक्षा झालेले कोलकाता उच्च न्यायालयाचे वादग्रस्त माजी न्यायाधीश न्या. सी. एस. कर्णन यांची बुधवारी सुटका करण्यात आली.  

ठळक मुद्दे वादग्रस्त माजी न्या. सी. एस. कर्णन यांची सुटकामुख्य न्यायमूर्ती जे. एस. केहर आणि इतर न्यायाधीशांवर केले होते भ्रष्टाचाराचे आरोप ‘कन्टेप्ट ऑफ कोर्ट’चा बडगा उगारून सहा महिन्यांची शिक्षा

कोलकाता : न्यायालयीन अवमानाबद्दल सहा महिने तुरूंगवासाची शिक्षा झालेले कोलकाता उच्च न्यायालयाचे वादग्रस्त माजी न्या. सी. एस. कर्णन यांची बुधवारी सुटका करण्यात आली.  न्या. सी. एस. कर्णन यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. त्यांना कोलकाता पोलिसांनी चेन्नईतील कोयम्बतूर येथून 20 जूनला अटक केली होती. न्या. सी. एस. कर्णन यांनी सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालिन मुख्य न्यायमूर्ती जे. एस. केहर आणि इतर न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे असे आरोप करणे म्हणजे एकप्रकारे न्यायलयाचा अवमान असल्याचे न्यायमूर्ती जे. एस. केव्हर यांनी म्हटले  होते. याप्रकरणी सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले होते. न्या. सी. एस. कर्णन मूळचे चेन्नई उच्च न्यायालयाचे. तेथे त्यांनी अनेक वाद निर्माण केल्याने त्यांची कोलकाता उच्च न्यायालयात बदली केली गेली होती. तेथे बसूनही त्यांनी आपल्या वादग्रस्त उक्ती व कृतीचा सपाटा सुरु ठेवल्याने सर्वोच्च न्यायालयाने अखेर त्यांच्यावर ‘कन्टेप्ट ऑफ कोर्ट’चा बडगा उगारून सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली होती.

दरम्यान, न्या. सी. एस. कर्णन यांची पत्नी सरस्वती आणि मुलगा सुगन त्यांच्या सुटकेच्यावेळी प्रेसिडेन्सी कारागृहात हजर होते. तसेच, त्यांचे जवळचे सहयोगी आणि वकील मॅथ्यू जे मेदुमपारा सुद्धा उपस्थित होते. यावेळी त्यांच्या पत्नी सरस्वती म्हणाल्या की, पुढील दहा दिवस आम्ही कोलकात्यातच थांबणार असून न्या. सी. एस. कर्णन यांच्या   पेन्शनशी संबंधित काही औपचारिकता या दिवसांत पूर्ण करणार आहोत. 

टॅग्स :Courtन्यायालय