शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर लँडिगमध्ये विघ्न; हेलिपॅडवर ठेवले लोखंडी पिंप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 11:44 IST

हेलिकॉप्टरचा अपघात होता होता थोडक्यात बचावला.

नवी दिल्ली: उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या ताफ्यातील कर्मचारी आणि भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांमध्ये सोमवारी बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला. हा वाद इतका टोकाला पोहोचला की, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी हेलिपॅडवर लोखंडी पिंप ठेवून मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यास अटकाव केला. त्यामुळे त्रिवेंद्र सिंह रावत यांचे हेलिकॉप्टर आयत्यावेळी दुसऱ्या ठिकाणी उतरवावे लागले. यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात होता होता थोडक्यात बचावला. या घटनेनंतर उत्तराखंडमधील सरकारी अधिकारी आणि सैन्यामध्ये भांडण जुंपले आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून या प्रकरणी लष्करी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.काही दिवसांपूर्वी उत्तरकाशी जिल्ह्यातील सावनी गावात मोठी घराला आग लागली होती. या आगीत मोठ्याप्रमाणावर वित्तहानी आणि पशुधनाचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर त्रिवेंद्र सिंह रावत याठिकाणी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आला होता. त्यासाठी मुख्यमंत्रांचे हेलिकॉप्टरने देहरादूनच्या जीटीसी हेलिपॅडवर उतरणार होते. मात्र, ऐनवेळी भारतीय लष्कराने आक्षेप घेत गोल्ड ग्राऊंडच्या प्रवेशद्वारावर स्वत:ची गाडी लावून हा मार्ग रोखून धरला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यातील कर्मचाऱ्यांनी ही गाडी हटवण्यास सांगितले. तेव्हा हा आमचा परिसर असून याठिकाणी आमच्या परवानगीनेच लोक येऊ शकतात, असे लष्करी अधिकाऱ्याने म्हटले. एवढेच नव्हे तर सैन्याने मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर ज्या हेलिपॅडवर लँड होणार होते तिथे लोखंडी पिंप ठेवले. त्यामुळे वैमानिकाला ऐनवेळी मैदानातील दुसऱ्या जागेवर हेलिकॉप्टर उतरवावे लागले. मात्र, यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात होण्याची शक्यता होती. दरम्यान, या घटनेनंतर त्रिवेंद्र सिंह रावत यांनी सैन्याधिकाऱ्यांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली. देशातील जमीन ही खासगी मालकीची नसून त्यावर संपूर्ण देशाचा हक्क आहे. दरम्यान, आता या प्रकरणात पुढे काय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटना