शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

दिल्लीच्या नेहरू, इंदिरा गांधी स्टेडियमची निर्गुंतवणूक; केंद्राच्या १२ हजार कोटी उभे करण्याच्या योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 11:13 IST

दिल्लीतील प्रतिष्ठेचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम आणि इतर महत्त्वाच्या संकुलांतून सरकारने अंग काढून घेतले तर किती पैसा उभा राहू शकतो याचे प्रारूप तयार करण्यासाठी केंद्र सरकारने देवघेव सल्लागार नियुक्त केला आहे.

हरीश गुप्तानवी दिल्ली : दिल्लीतील प्रतिष्ठेचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम आणि इतर महत्त्वाच्या संकुलांतून सरकारने अंग काढून घेतले तर किती पैसा उभा राहू शकतो याचे प्रारूप तयार करण्यासाठी केंद्र सरकारने देवघेव सल्लागार नियुक्त केला आहे. लवकरच हे प्रारूप उपलब्ध होईल. 

वर्ष २०२२-२०२५ या ३ वर्षांत १२ हजार कोटी रुपये उभे करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या मालमत्तांत नेहरू स्टेडियम, इंदिरा गांधी स्टेडियम आणि (झिरकपूर) पंजाब आणि (बंगळुरू) कर्नाटकमधील स्पोर्टस ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या केंद्रांचा समावेश आहे. नेहरू स्टेडियम १९८० मध्ये एशियाड क्रीडा स्पर्धांच्या वेळी बांधले गेले. या स्टेडियमच्या माध्यमातून सरकारी खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) ‘न्यू दिल्ली स्पोर्टस हब’ या नावाने पैसा उभा केला जाईल.

पीपीपी तत्त्वावर महसूल उभा करण्यासाठी या स्टेडियममध्ये मॉल्स आणि इतर सुखसोयी असतील. युवक कामकाज आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले की, पैसा उभा करण्यासाठी कोणती संपत्ती तयार ठेवली जाऊ शकते हे ओळखण्यासाठी नॅशनल मोनिटायझेशन पाइपलाइनचाच हा भाग असून, ती प्रक्रिया केली गेलेली आहे.

निविदा प्रक्रिया सुरू होणार-    सूत्रांनी सांगितले की, या आर्थिक वर्षात निविदा जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.-    इंदिरा गांधी स्पोर्टस कॉम्प्लेक्सशी संबंधित सुरक्षा आणि नदी पात्राचा प्रश्नही सोडवला गेलेला आहे.

कोरोना साथीमुळे योजना प्रलंबितआर्थिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये हे काम करण्याचे सरकारने ठरवले होते. परंतु, कोविड महामारीने सगळी योजनाच रुळांवरून घसरली. आता सरकारने पीपीपी प्रारूपाद्वारे निर्गुंतवणुकीला वेग दिला असून, येत्या तीन वर्षांत त्यातून १२ हजार कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.