दिशा रवीला माहीत होते टूलकिट बनविण्याचे परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 02:42 AM2021-02-17T02:42:11+5:302021-02-17T02:42:33+5:30

Disha Ravi : दिल्ली पोलिसांनी दिशाला अटक करून तिचे इलेक्ट्राॅनिक उपकरणे जप्त केली. दिशाने तिचा डेटा डिलीट केला असून तो मिळविला जात आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Disha Ravi knew the consequences of making a toolkit | दिशा रवीला माहीत होते टूलकिट बनविण्याचे परिणाम

दिशा रवीला माहीत होते टूलकिट बनविण्याचे परिणाम

Next

- नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : दिल्लीत २६ जानेवारील झालेल्या हिंसाचाराच्या तपासात टूलकिटची मुळे शोधताना दिल्ली पोलिसांच्या हाती रोज नवे दुवे लागत आहेत. पोलीस याप्रकरणी अटकेत असलेल्या दिशा रवीकडे विचारपूस करत आहेत. मंगळवारी दिशा व ग्रेटा थनबर्ग यांच्यातील चॅटिंग सार्वजनिक झाली. त्यातून हे समजले की, दिशाला हे माहीत होते की आपण जे करत आहोत त्याचे परिणाम काय होतील.
चॅट अशावेळी केले की, जेव्हा ग्रेटाने चुकून दिशाच्या टूलकिटला आपल्या ट्विटर पोस्टसोबत जारी केले होते. चूक लक्षात आली तेव्हा ग्रेटाने दिशाला संदेश पाठवून त्याला दुरुस्त करण्यास सांगितले व म्हटले की, तिला यामुळे बऱ्याच अडचणी येतील. त्यानंतर तिला टूलकिट ट्विट न करण्याचा दिशाने सल्ला दिला. तसेच  वकिलांशी बोलण्यासही सांगितले. रवीने म्हटले की, त्यात आमची नावे लिहिली आहेत. त्यामुळे आम्हाला यूएपीएला तोंड द्यावे लागू शकते.
दिल्ली पोलिसांनी दिशाला अटक करून तिचे इलेक्ट्राॅनिक उपकरणे जप्त केली. दिशाने तिचा डेटा डिलीट केला असून तो मिळविला जात आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. चॅटमध्ये दिशाने लिहिले की, ‘वस्तुस्थिती ही आहे की मला खूप खेद आहे, आम्ही सगळे घाबरलेलो आहोत. कारण प्रकरण बिघडत आहे. परंतु, आम्ही हे सुनिश्चित करू की, तुमचे नाव खराब होणार नाही. आम्हाला सर्व काही डिॲक्टिवेट करावे लागेल.’
दिल्ली पोलीस सूत्रांनुसार दिशा जे टूलकिट तयार करण्यात सहभागी होती त्याची योजना कॅनडात पोएटिक जस्टिस नावाच्या संघटनेच्या एम. ओ धालिवालने बनविली होती. त्याने त्याच्या जवळच्या पुनितच्या माध्यमातून शंतनू आणि नीकिताकडून भारतात संपर्क केला होता. त्यांचा उद्देश २६ जानेवारील आपल्या योजनेनुसार ग्लोबल ‘डे ऑफ ॲक्शन’ करणे. त्या आधी आणि नंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून डिजिटल स्ट्राईक करण्याची योजनाही तयार केली होती.
टूलकिटबाबत ज्या शंतनू मुळूकचे नाव घेतले जात आहे तो महाराष्ट्रातील बीडचा रहिवासी आहे. तो शेतकरी आंदोलनाशी जोडलेला होता. पोलिसांचे म्हणणे असे की, शंतनू २० ते २७ जानेवारीदरम्यान टीकरी सीमेवर हजर होता. दिल्ली पोलिसांनी बीडमध्ये जाऊन त्याच्या घरी छापा घातला; परंतु, त्याचा पत्ता लागला नाही. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले गेले आहे. 

आयएसआयशी संबंध! 
या प्रकरणातील महत्त्वाची नीकिता जैबकही बेपत्ता आहे. पोलिसांनी तिच्याशी ११ फेब्रुवारीला बंगळुरूत संपर्क केला होता तेव्हा सायंकाळी भेट झाली होती. तिच्याशी दुसऱ्या दिवशी तिच्या घरी विचारपूस करण्याचे ठरले होते. पण दुसऱ्या दिवशी पोलीस तिच्या घरी गेले तेव्हा ती फरार झाली होती. याप्रकरणी कॅनडात राहणाऱ्या अनिता लालचे नाव जोडले गेले आहे. ती वर्ल्ड शिख ऑर्गनायझेशनची सहसंस्थापकही आहे. पोलिसांना या प्रकरणाचे धागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी जोडले गेले असावेत, अशी शंका आहे.

Web Title: Disha Ravi knew the consequences of making a toolkit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.