शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांशी चर्चा; पण कायदे रद्द करणार नाही; केंद्र सरकार ठाम, अमरिंदर सिंग यांनाही  संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 06:16 IST

पुढील वर्षीच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यातही उत्तर प्रदेश व पंजाबची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आहे. दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणारे बहुसंख्य शेतकरी याच दोन राज्यांतील आहेत. 

हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार आहोत; पण तिन्ही कृषी कायदे कोणत्याही परिस्थितीत रद्द करायचेच नाहीत, असे केंद्र सरकारने ठरविले आहे. या कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला २६ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत असताना मोदी सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

पुढील वर्षीच्या सुरुवातीला उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यातही उत्तर प्रदेश व पंजाबची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आहे. दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणारे बहुसंख्य शेतकरी याच दोन राज्यांतील आहेत. या आंदोलनाचा दोन्ही राज्यांत भाजपला फटका बसेल, अशी शक्यता काही जण व्यक्त करीत आहेत. तरीही कृषी कायदे रद्द न करण्याचे केंद्राचे धोरण यापुढेही कायम राहील. 

 आपली ही भूमिका भाजपने पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनाही कळवली आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व काही करू; पण तुम्ही आमच्याशी पंजाबमध्ये निवडणूक समझोता केला, म्हणून त्या बदल्यात कायदे रद्द करावेत वा त्यात बदल करण्यात यावा, अशी तुमची मागणी असेल, तर ती पूर्ण होणार नाही, असा स्पष्ट निरोप केंद्राने सिंग यांना दिला आहे.  आमची अमरिंदर सिंग यांच्याशी युती देशाच्या ऐक्य व अखंडतेसाठी आहे. त्यांच्याशी युती करणे याचा अर्थ कायदे रद्द करणे असा होत नाही, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले. तो म्हणाला की, अमरिंदर सिंग यांच्यामार्फत शेतकरी नेते चर्चेसाठी पुढे आल्यास आम्ही त्यास तयार आहोत. दिल्लीच्या सीमांवरून काढण्यात आलेले बॅरिकेट्स हे निर्बंध दूर करण्यासाठी आहेत, शेतकऱ्यांना तेथून हटवणे हा त्याचा हेतू नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. 

शेतकऱ्यांकडून प्रस्ताव नाही -तोमरकेंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आम्ही अनेकदा शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि यापुढेही करू. कायद्यांच्या अंमलबजावणीला १८ महिन्यांसाठी स्थगितीही देण्यात आली आहे; पण शेतकरी नेत्यांकडून आम्हाला ठोस असा प्रस्ताव मिळालेलाच नाही.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन