शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बनारस विद्यापीठाच्या कुलगुरुपदी 'मराठी माणूस', औरंगाबाद ते काशीपर्यंत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 15:40 IST

बायोटेक्नॉलॉजीचे अभ्यासक असलेले चोपडे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी 4 जून 2014 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ दीड वर्षच राहिलेला असताना त्यांना ही संधी मिळाली आहे.

नवी दिल्ली - औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू बी. ए. चोपडे यांची प्रसिद्ध बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चोपडे यांच्या नियुक्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे.  बायोटेक्नॉलॉजीचे अभ्यासक असलेले चोपडे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी 4 जून 2014 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ दीड वर्षच राहिलेला असताना त्यांना ही संधी मिळाली आहे.

प्रोफेसर डॉ. बी.ए.चोपडे यांची नियुक्ती झाल्याची सोशल मीडियावर काल रात्रीपासून जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर याबद्दल चर्वित चर्वण सुरु होते. विद्यापीठाच्या अधिकृत सुत्रांनी या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. दुसरीकडे औरंगाबादमध्येही डॉ. चोपडे काशी विद्यापीठात जात असल्याची चर्चा आहे. 

 

गेल्यावर्षी बीएचयूमध्ये मुलींची छेडछाड झाल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. ही परिस्थिती हाताळण्यात बीएचयूचे कुलगुरू प्रा. जी. एस. त्रिपाठी यांना अपयश आले होते. त्यामुळे त्यांना दीर्घकालीन सुट्टीवर पाठविण्यात आले आल्याने बीएचयूमधील कुलगुरुपद रिक्त होते. त्यानंतर हे पद भरण्याची प्रक्रिया राष्ट्रपतींनी सुरू केली होती. कोणतेही आरोप नसलेले आणि पदासाठी पात्र ठरणारे कुलगुरू शोधण्याचे काम सुरू होते. त्यात अनेक पेटंट नावावर असलेल्या डॉ. चोपडे यांनी बाजी मारली आहे.

कुलगुरुंनी केला अभिनंदनाचा स्वीकारमाध्यमांनी कुलुगुरुंशी संपर्क केला असता त्यांनी अभिनंदनाचा स्वीकार केला. नियुक्ती पत्र अद्याप मिळाले नसल्याचे ते म्हणाले. पत्र मिळाल्यानंतर कुलपती सी.विद्यासागर राव यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करुन वाराणसीला रवाना होणार असल्याचे डॉ. चोपडे यांनी सांगितले. अशीही चर्चा आहे की केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रो. डॉ. चोपडे यांच्या नियुक्तीचे पत्र विद्यापीठाला पाठवले आहे   

टॅग्स :BHUबनारस हिंदू विश्वविद्यालयDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद