शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची महाराष्ट्रासह पाच विधानसभेबाबत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 03:26 IST

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि यापुढेही अध्यक्ष असतील,

शीलेश शर्र्मा 

नवी दिल्ली : काँग्रेस महाराष्ट्रासह पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. या निवडणुकांची रणनीती ठरविण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीसांची बैठक बोलाविण्यात येणार आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए. के. अ‍ॅन्टोनी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत विधानसभेच्या आगामी निवडणुकांची तयारी आणि पक्ष मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. राहुल गांधी हेच यापुढेही काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असतील, असा निर्णयही याच बैठकीत घेण्यात आला.लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक होणाºया राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलावेत की नाही, या मुद्यांवर काँग्रेस सरचिटणीसांच्या बैठकीनंतर निर्णय होईल, असे संकेत आहेत. बैठकीनंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, ही बैठक अनौपचारिक होती. या बैठकीला अहमद पटेल, पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश, के. सी. वेणुगोपाल आणि आनंद शर्मा यांच्यासह अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीला राहुल गांधी यांची उपस्थिती नव्हती.

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि यापुढेही अध्यक्ष असतील, यात कोणतीही शंका नाही. तेव्हा अन्य पर्यायावर विचार करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. लोकसभा आणि राज्यसभेतील काँग्रेसच्या नेत्यांबाबत संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी निर्णय घेतील, असेही सुरजेवाला यांनी स्पष्ट केले. महाराष्टÑातील विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेस अत्यंत गंभीर आहे. काँग्रेस महाराष्टÑात राष्टÑवादी काँग्रेससोबत निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहे. महाराष्टÑाचे प्रभारी खरगे हे आतापासूनच निवडणूक रणनीती आखण्यास लागले आहेत. काँग्रेस सरचिटणीसांच्या बैठकीत या रणनीतीबाबत ते माहिती देण्याची शक्यता आहे. महाराष्टÑासह हरियाणा, झारखंड, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी