शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा चर्चा फेल! लाइव्ह स्ट्रीमिंगवर डॉक्टर ठाम; ममता म्हणाल्या, आपण अशा पद्दतीने माझा अपमान करू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 22:37 IST

यापूर्वी, पश्चिम बंगाल सरकारने गुरुवारी डॉक्टरांची बैटक बोलावली होती. तेव्हा ममता बॅनर्जी वाट बघत बसल्या मात्र डॉक्टर आले नव्हते.

कोलकात्यातील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात ज्युनिअर डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर झालेली तिची हत्या, या प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्ये डॉक्टर रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. हे आंदोलक डॉक्टर आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची बैठक आता दुसऱ्यांदा फेल झाली आहे. यापूर्वी, पश्चिम बंगाल सरकारने गुरुवारी डॉक्टरांची बैटक बोलावली होती. तेव्हा ममता बॅनर्जी वाट बघत बसल्या मात्र डॉक्टर आले नव्हते.

आंदोलक डॉक्टरांनी शनिवारी पश्चिम बंगाल सरकारला ईमेल पाठवत बैठक बोलावण्याची मागणी केली होती. यानंतर ममता सरकारकडून 6 वाजता बैठक बोलावली होती. यानंतर ज्युनिअर डॉक्टरांचा समूह बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्तानी पोहोचला. मात्र बैठकीचे लाइव्ह स्ट्रीमिंग करण्यावरून बैठक सुरू होऊ शकली नाही. बैठकीचे लाइव्ह स्ट्रीमिंग व्हावे, अशी डॉक्टरांची मागणी आहे. तर प्रकरण न्यायालयात असल्याने बैठकीचे लाइव्ह स्ट्रीमिंग केले जाऊ शकत नाही, ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

"आपण अशा पद्धतीने माझा अपमान करू शकत नाही" - यावेळी, ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ममता म्हणाल्या, आम्ही अनेक दिवसांपासून हा गतिरोध संपवण्याचा प्रयत्न करत आहोत, कृपया चर्चा करा. मात्र, डॉक्टर आपल्या मागणीवर ठाम राहिले. तेव्हा ममता म्हणाल्या, आपण अशा पद्दतीने माझा अपमान करू शकत नाही. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीdoctorडॉक्टरTrinamool Congressतृणमूल काँग्रेस