शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे बडे नेते लोकसभेच्या मैदानात? चार राज्यांतील नावांवर चर्चा; माजी  मुख्यमंत्री अन् महत्त्वाच्या नेत्यांना उतरवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 08:21 IST

छत्तीसगडमधून माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, प्रदेशाध्यक्ष दीपक बैज आणि ज्योत्स्ना महंत यांना तिकीट देऊ शकते. ७ मार्च रोजी दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून, त्यात या नावांना अंतिम मंजुरी दिली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

आदेश रावल -

नवी दिल्ली :  भाजपने आपल्या पहिल्या यादीत १९५ लोकसभा उमेदवारांची घोषणा केली आहे, तर काँग्रेसमध्ये सध्या स्क्रीनिंग कमिटीमध्ये (छाननी समिती) उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या समितीने चार राज्यांतील वरिष्ठ नेत्यांना रिंगणात उतरवण्याची सूचना केली आहे. छत्तीसगड, राजस्थान, हरयाणा आणि दिल्लीतील अनेक नावांवर चर्चा झाली आहे.छत्तीसगडमधून माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, प्रदेशाध्यक्ष दीपक बैज आणि ज्योत्स्ना महंत यांना तिकीट देऊ शकते. ७ मार्च रोजी दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून, त्यात या नावांना अंतिम मंजुरी दिली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

दिग्गजांच्या लढाईतून फायदा काय? - बहुतांश राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेबाहेर असल्याचे पक्षाच्या रणनीतीकारांचे मत आहे. - दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यास त्याचा परिणाम कार्यकर्त्यांच्या मनोबलावर दिसून येईल आणि पक्ष एकदिलाने लढेल. - तसेच जवळच्या जागांचे समीकरण बदलणेही फायदेशीर ठरेल, असे सांगितले जाते.

कोण, कुठून लढणार?राजस्थानमधून सचिन पायलट, प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे चिरंजीव वैभव गेहलोत, बिजेंद्र ओला, भंवर जितेंद्र सिंह, सी.पी. जोशी, हरीश चौधरी यांच्या नावांवरही चर्चा आहे. दिल्लीतून प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लवली आणि उदित राज यांना तिकीट देण्याचा विचार सुरू आहे. हरयाणातून दीपेंद्र हुड्डा, कुमारी शैलजा आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांना तिकीट दिले जाऊ शकते. दीपेंद्र हुड्डा आणि सुरजेवाला हे दोघेही राज्यसभेचे सदस्य आहेत.

हे दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात? -प्रियांका गांधी, सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यानंतर त्या रायबरेलीतून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यांच्या निवडणूक लढण्याचा परिणाम इतर जागांवर होऊ शकतो.

अशोक गेहलोत १९८० ते १९९८ या काळात जोधपूरमधून लोकसभेच्या सहापैकी पाच निवडणुका जिंकल्या. जोधपूरमधून उमेदवार झाल्यास जालोर, पाली, बाडमेर येथे फायदा.

भूपेश बघेल, माजी मुख्यमंत्रीलोकसभा निवडणूक कधीच लढवली नाही. यावेळी राजनांदगावमधून उमेदवारी दिली जाऊ शकते. स्क्रीनिंग कमिटीने त्यांच्या नावावर चर्चा केली आहे.

सचिन पायलट, ते छत्तीसगडचे प्रभारी आहेत, जनतेचा पाठिंबा पाहता त्यांना टोंक-सवाई माधोपूरमधून उमेदवारी दिली जाऊ शकते. याचा परिणाम अजमेर, दौसा, ढोलपूर-करौली जागांवर होऊ शकतो.

बी. श्रीनिवास, कोरोनाच्या काळात ऑक्सिजन मॅन म्हणून प्रसिद्ध झाले. मोदी सरकारच्या विरोधात अनेक  निदर्शने झाली.  बंगळुरूमधून उमेदवार देत तरुणांना संदेश दिला जाऊ शकतो.

राहुल गांधींची इच्छा : पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच्या बैठकीत राहुल गांधी यांनीही इच्छा व्यक्त केलेली आहे की, माजी मुख्यमंत्री, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील नेते, सरचिटणीस आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी. 

मागील निवडणुकांत काय? -

 

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक