शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

आश्वासने व भाषणांऐवजी लोकांना हवे प्रत्यक्ष काम

By admin | Updated: October 20, 2016 04:34 IST

सुलतानपूर जिल्ह्यात पाच लहानशा खेड्यांत चमकदार पिवळ्या रंगाने सजलेल्या छोट्या घरकुलांचे मालकी हक्क मंगळवारी भाजपचे तरुण खासदार वरुण गांधींनी २८ गरीब कुटुंबांच्या स्वाधीन केले

सुरेश भटेवरा,

सुलतानपूर- उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर जिल्ह्यात पाच लहानशा खेड्यांत चमकदार पिवळ्या रंगाने सजलेल्या छोट्या घरकुलांचे मालकी हक्क मंगळवारी भाजपचे तरुण खासदार वरुण गांधींनी २८ गरीब कुटुंबांच्या स्वाधीन केले. ही घरे कोणत्याही सरकारी योजनेतून अथवा खासदार निधीतून तयार झालेली नसून, वरुण गांधींनी आपल्या खासदारकीच्या मासिक वेतनातून व स्वत:च्या कमाईतून बांधून दिली आहेत. अशी एकुण १00 घरे गरीबांना देण्याची मोहीम वरुण गांधीनी हाती घेतली असून, आणखी ७२ घरांचे बांधकाम सध्या सुरू आहे. या मोहिमेचे चळवळीत रूपांतर करण्याची तयारी खा. गांधींनी चालवली आहे. दिल्लीहून लोकमतच्या प्रस्तुत प्रतिनिधीसह निवडक पत्रकारांना मंगळवारी वरुण गांधींनी या कार्यक्रमाला नेते होते. बेला मोहन, सैतापूर सराय, पगडी सराय, मल्हिपूर, पदारथपूर गावांमधे या निमित्ताने सरासरी दोन हजार ग्रामस्थांच्या ५ छोटेखानी सभांत त्यांनी भाषणे केली. ते म्हणाले, ‘राजकीय पक्षाशी अथवा निवडणुकीच्या राजकारणाशी ही मोहीम संबंधित नाही. उत्तरप्रदेशच्या गरीब ग्रामस्थांची व कर्जग्रस्त शेतकऱ्यांची दैना दूर करण्यासाठी योजलेल्या एका सामाजिक चळवळीची ही छोटी सुरुवात आहे.लवकरच या मोहिमेची वेबसाईट व मोबाइल अ‍ॅप तयार करण्यात येईल. त्या डिजिटल व्यासपीठावर उत्तरप्रदेशच्या गरीब कुटुंबांना साऱ्या जगाशी जोडले जाईल. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेद्वारे दोन वर्षांत गरीब कुटुंबांना १0 हजार घरे व १0 हजार शेतकऱ्यांना पूर्णत: कर्जमुक्त करण्याचा संकल्प आहे. स्वत:च्या मालकीचे पक्के घर गरीब कुटुंबांना मिळावे व कर्जग्रस्त शेतकऱ्यांवर आत्महत्येचा प्रसंग ओढवू नये हा या मोहिमेचा हेतू आहे. उत्तरप्रदेशात या मोहिमेला यश मिळाल्यास ही चळवळ देशव्यापी बनवण्याचा इरादा आहे, असेही त्यांनी बोलून दाखवले.>लोकवर्गणीतून शेतकऱ्यांची कर्जमुक्तीशेतीच्या न संपणाऱ्या समस्या आणि कर्जाचे ओझे यामुळे आत्महत्येसाठी प्रवृत्त झालेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी वरूण यांनी उत्तरप्रदेशात दुसरी अभिनव चळवळही सुरू केली आहे. आपल्या खासदारकीचे गेल्या चार वर्षांचे १ कोटी ६0 लाखांचे संपूर्ण वेतन तर कर्जमुक्तीसाठी वरूणनी दिलेच; याखेरीज आग्रा, मेरठ, मुजफ्फरनगर, बिजनोर, बहराईच, लखीमपूर खिरी, प्रतापगड, अलिगड, सुलतानपूर, सीतापूर, मोरादाबाद अशा २0 जिल्ह्यांत फिरून गरीब शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी धनिक वर्गामधे जागरूकता निर्माण करण्यातही यश मिळवले. कर्जमुक्तीच्या या अभिनव चळवळीत सधन समाज गटही उत्साहाने सहभागी झाला आहे. आजवर १७ कोटी ८0 लाख रूपयांचे योगदान स्वत:हून त्यांनी दिले. त्यातून ३२६0 शेतकरी कुटुंबे पूर्णत: कर्जमुक्त करण्याचे यश वरुण गांधींना मिळाले. कर्जमुक्तीची ही मोहिम राबवण्यापूर्वी वरूण गांधी व त्यांच्या स्थानिक कार्यक र्त्यांच्या टीमने प्रशासन व बँकांशी संपर्क साधला. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची सविस्तर माहिती मिळवली. दुष्काळ व नैसर्गिक आपत्तीमुळे सलग ३ वर्षे ज्यांची पिके नष्ट झाली, कर्जाचा बोजा वाढत गेला आणि शेतजमिनीखेरीज कोणतीही अचल संपत्ती ज्या शेतकऱ्यांकडे नाही, या तीन ३ प्रमुख निकषांनुसार गरजू कर्जग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली. त्यानंतर स्थानिक वकील, व्यापारी, उद्योजक, सधन शेतकरी अशा विविध समाज घटकांच्या बैठका घेतल्या. त्यात या गरजवंत शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले. या मोहिमेतून जवळपास १७ कोटी ८0 लाख रूपयांचा निधी उभा राहिला. तो गरजू शेतकऱ्यांना या दानशूरांच्या हस्ते लगेच वितरित करण्यात आला.