शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडात सापडला डायनासोर सदृश्य प्राण्याचा सांगाडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 14:02 IST

 नैनीतालपासून सुमारे 110 किमी अंतरावर असणाऱ्या जसपूर या छोट्याश्या शहरात असलेल्या विद्युत उपक्रेंद्रातील जुन्या खंडहरनुमा भवनात एक डायनासोर सदृश्य प्राण्याचा सांगाडा सापडला आहे.

ठळक मुद्दे नैनीतालपासून सुमारे 110 किमी अंतरावर असणाऱ्या जसपूर या छोट्याश्या शहरात असलेल्या विद्युत उपक्रेंद्रातील जुन्या खंडहरनुमा भवनात एक डायनासोर सदृश्य प्राण्याचा सांगाडा सापडला आहे. शहराच्या फैज-ए-आम मार्गावरील विद्युत उपकेंद्रावरील भवन 35 वर्ष जून आहे. त्या ठिकाणी बीलिंग काऊंटर बनविण्यासाठी रविवारी त्या भवनाची साफसफाई सुरू असताना विभागीय कर्मचाऱ्यांना हा सांगाडा आढळून आला.

जसपूर-  नैनीतालपासून सुमारे 110 किमी अंतरावर असणाऱ्या जसपूर या छोट्याश्या शहरात असलेल्या विद्युत उपक्रेंद्रातील जुन्या खंडहरनुमा भवनात एक डायनासोर सदृश्य प्राण्याचा सांगाडा सापडला आहे. शहराच्या फैज-ए-आम मार्गावरील विद्युत उपकेंद्रावरील भवन 35 वर्ष जून आहे. त्या ठिकाणी बीलिंग काऊंटर बनविण्यासाठी रविवारी त्या भवनाची साफसफाई सुरू असताना विभागीय कर्मचाऱ्यांना हा सांगाडा आढळून आला.

ज्या भागात हा डायनासोर सदृश्य प्राण्याचा सांगाडा सापडला तो भाग राज्य महावितरणाच्या विभागात आहे. प्राण्याच्या सांगाड्याची लांबी दोन फूट तर उंची एक फूट असल्याचं सांगितलं जातं आहे. जसपूरमध्ये सापडलेला प्राण्याचा हा सांगाडा हुबेहूब डायनासोर सारखा दिसतो. पोलिसांनी हा सांगाडा ताब्यात घेतला असून पुढे वन अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची शरीर रचना असलेले जीव उत्तराखंडाच्या जंगलात कधीही पाहिले गेलेले नाहीत. 

काम करताना काही कामगारांना प्राण्याचा सांगाडा आढळून आल्यानंतर त्यांनी त्याची माहिती ठेवेदाराला दिली. ठेकेदाराने पोलिसांना याबद्दल सांगितलं असून आम्ही पुरातत्व विभागालाही याबद्दलची माहिती दिल्याचं, विद्युत विभागाचे अधिकारी बळी राम यांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितलं आहे. 

बंद असलेल्या घरात काही प्राणी आले असतील आणि त्यांचा मृत्यू झाला असेल, अशी शक्यता वर्तविली जाते आहे. संबंधित विभागाला याबद्दलची तक्रार दिली असल्याचं, जसपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी अब्दुल कलाम यांनी सांगितलं. 

डायनासोरसारख्या दिसणाऱ्या प्राण्याची बोट जवळपास 29 सेमीची असून त्याची शेपूट 5 सेंमी आहे. या सांगाड्याला तपासणीसाठी डेहराडूनच्या वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डायनासोरसारख्या प्राण्याचा सांगाडा सापडल्याची माहिती सगळीकडे पसरताच लोकांनी त्याला बघायला मोठी गर्दी केली. 'जसपूर भागात पालीसारखे दिसणारे प्राणी असू शकतात. म्हणून या प्राण्याच्या सांगाड्याला पाहून आम्ही थोडे गोंधळले आहोत. या प्राण्यांचा परिसरात शोध घेण्यासाठी प्रशासनाकडे मदत मागितली असल्याचं, एका स्थानिक नागरिकाने सांगितलं आहे.