मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यात रविवारी एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गडासराय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किकरातालाब गावाजवळ जबलपूर-अमरकंटक नॅशनल हायवेवर रात्री एकच्या सुमारास घडली. एका पोलीस अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली.
टायर बदलताना ट्रकने चिरडलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व लोक एका पिकअप वाहनाने आपल्या घरी परतत होते. याच दरम्यान वाहनाचा एक टायर अचानक पंक्चर झाला. त्यानंतर चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून टायर बदलण्यास सुरुवात केली, तर वाहनातील इतर लोक खाली उतरून जवळच उभे राहिले. याच वेळी तिथून जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने रस्त्यावर उभे असलेल्या लोकांना चिरडलं.
डिंडोरीच्या पोलीस अधीक्षक वहनी सिंह यांनी सांगितलं की, हा अपघात इतका भीषण होता की पिकअप चालकासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
ट्रक चालकाला अटक
प्राथमिक तपासात असे समोर आलं आहे की, ट्रक चालकाला डुलकी लागली होती, ज्यामुळे रस्त्यावर उभे असलेले लोक त्याला दिसले नाहीत. मात्र लोक रस्त्याच्या मध्यभागी उभे होते, त्यामुळे अपघात टाळणं शक्य झालं नाही, असा दावा ट्रक चालकाने केला आहे. सध्या पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे.
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हायवेवर ट्रक चालक बेजबाबदारपणे गाड्या चालवतात, ज्यामुळे दररोज असे अपघात होतात, असं परिसरातील नागरिकांचं म्हणणं आहे. प्रशासनाने ट्रक चालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.
Web Summary : In Madhya Pradesh's Dindori, a truck ran over people changing a flat tire, killing five. The driver allegedly fell asleep. An investigation is underway.
Web Summary : मध्य प्रदेश के डिंडोरी में टायर बदलते समय एक ट्रक ने लोगों को कुचल दिया, जिससे पांच की मौत हो गई। ड्राइवर को कथित तौर पर नींद आ गई थी। जांच जारी है।