शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

६ कोटी कागदपत्रांचे डिजिटायझेशन; ४०० वर्षांच्या ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 06:39 IST

पुराभिलेख संचालनालयाची किमया

घनश्याम सोनार

मुंबई: राज्यातील ४०० वर्षांच्या ऐतिहासिक १७ कोटी दस्तऐवजांपैकी ६ कोटी कागदपत्रांचे डिजिटायझेशन मुंबईतील पुराभिलेख संचालनालयाकडून पूर्ण करण्यात आले आहे. मुंबईच्या पुराभिलेखागारात हे काम सुरू आहे. मुंबईत ब्रिटिशकालीन १० कोटी, तर राज्याच्या इतर कार्यालयातील शिवकालीन, पेशवेकालीन, निजामकालीन असे सात कोटी मिळून एकूण १६३० सालापासूनचे १७ कोटी ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध आहेत.

संपादक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राची मूळ प्रत तसेच महात्मा गांधींच्या दांडी यात्रेचा रोजचा अहवाल लंडनला टेलिग्रामद्वारे राणीला पाठविला जायचा. त्याची रोजनिशीदेखील येथे उपलब्ध आहे. हा ऐतिहासिक वारसा पुन्हा ३०० वर्षे टिकवण्याची किमया मायक्रोफिल्मिंग आणि डिजिटायझेशनद्वारे सुरू आहे. 

उरलेल्या सर्व कागदपत्रांच्या डिजिटायझेशनचे काम २०२७पर्यंत पूर्ण होईल, असे पुराभिलेख संचालनालयाचे म्हणणे आहे. 

...असे होते डिजिटायझेशन

जुन्या ऐतिहासिक कागदपत्रांना खास कश्मिरी सिफाॅन कापड आणि जापानी टिश्यू पेपरने लेप दिला जातो. त्यानंतर अत्याधुनिक संगणकाद्वारे त्याचे स्कॅनिंग होते. अत्याधुनिक कॅमेराद्वारे त्याचे मायक्रोफिल्मिंग केले जाते. मुंबईत हवेतील असलेल्या आर्द्रतेच्या प्रमाणामुळे हे काम केवळ नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीतच होऊ शकते.

आम्ही केवळ दस्तऐवज ठेवत नाही, तर ते जसे आहे तसे जपतो. त्याचे संवर्धन करतो. या कामासाठी सांस्कृतिक विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचे मार्गदर्शन आणि सांस्कृतिक  विभागाचे मंत्री आशिष शेलार यांच्या पाठिंब्यामुळेच यावर्षी ८० कोटी रुपये मिळाले आहेत -सुजितकुमार उगले, संचालक, पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र 

टॅग्स :MumbaiमुंबईAshish Shelarआशीष शेलार