शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अबकी बार, मुश्किल है यार! 2019 साठी भाजपाची वाट बिकट 

By balkrishna.parab | Updated: June 3, 2018 11:02 IST

सर्वसामान्यांमध्ये निर्माण होत असलेला असंतोष तसेच विरोधकांची देशपातळीवर होत असलेली एकजुट भाजपासाठी डोकेदुखी ठरणार असून, अबकी बार मुश्किल है यार, असे म्हणण्याची वेळ नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर आली आहे. 

चार लोकसभा मतदारसंघांसह 14 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत पालघर लोकसभा आणि थराली विधानसभा मतदारसंघ तसेच नागालँडमध्ये भाजपाच्या मित्र पक्षाने राखलेली लोकसभेची जागा वगळता  इतर सर्वत्र भाजपाचा धुव्वा उडाला. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कैराना आणि भंडारा गोंदिया मतदारसंघातही भाजपाची दाणादाण उडाली. केंद्रात आणि बहुतांश राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रभावक्षेत्रामध्ये या निवडणुका होत असल्याने सरकारच्या कामगिरीबाबत जनमताचा कौल म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारसह भाजपाशासित राज्यांमधील सरकारांबाबत असलेली नाराजी मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केल्याचा सर्वसाधारण निष्कर्श या निकालांमधून काढता येते.  चार लोकसभा मतदारसंघांसह 14 विधानसभा मतदारसंघातील या पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र, केरळ, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, मेघालय, नागालँड, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये मतदान झाले. तर कर्नाटक विधानसभेच्या एका जागेसाठीही मतदान झाले होते. मात्र या निवडणुकीत राजकीय वर्तुळाचे सर्वाधिक लक्ष होते ते महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील निकालांवर. त्यामध्ये महाराष्ट्रातील पालघरची जागा भाजपाने कशीबशी राखली. पण भंडारा गोंदिया आणि उत्तर प्रदेशमधील कैराना मतदारसंघात त्यांना सपाटून मार खावा लागला. भंडारा गोंदिया मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील आघाडी निर्णायक ठरली. तर उत्तर प्रदेशमधील कैराना मतदारसंघात राष्ट्रीय लोकदल, सपा, बसपा आणि काँग्रेस अशा विरोधी पक्षांच्या एकजुटीने भाजपाला भुईसपाट केले. तर नूरपूरमध्ये अटीतटीच्या लढाईत सपाने भाजपा उमेदवाराला पराभूत केले.  तिकडे बिहारमध्ये तेजस्वी यादवांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता दलाने भाजपा आणि जेडीयू आघाडीला पराभूत करत जोकिहाट मतदारसंघ जिंकला. तर झारखंडमध्ये  झारखंड मुक्ती मोर्चाने गोमिया आणि सिल्ली मतदारसंघात भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षाला पराभवाचा धक्का दिला. या निकालांकडे पाहिल्यानंतर विरोधी पक्षांची एकजूट भाजपाला भारी पडत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भातील भंडारा गोंदिया मतदासंघात भाजपाचा विजय होईल असे मानले जात होते. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलेली आघाडी भाजपाला भारी पडली. त्यातही शेतकऱ्यांसह विविध वर्गांमध्ये असलेला रोषही भाजपाच्या पराभवाचे कारण ठरला.  पालघरमध्ये भाजपाला विजय मिळाला खरा. पण शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीने भाजपासमोर उभे केलेले आव्हान लक्षणिय होते. त्यामुळे येथील भाजपाच्या विजयापेक्षा शिवसेना आणि बविआने त्यांना दिलेली झुंज पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने अधिक प्रभावी ठरणार आहे. तसेच या निवडणुकीत शिवसेनेने आपले उपद्रव मूल्यही दाखवून दिले आहे. त्यामुळे बदलत्या राजकीय वातावरणात भाजपासाठी युती अपरिहार्य बनली आहे.   2014 साली भाजपाच्या मोठ्या विजयात उत्तर प्रदेशने निर्णायक भूमिका बजावली होती. मात्र सपा, बसपा, काँग्रेस आणि लोकदल अशा पक्षांच्या झालेल्या एकजुटीने 2019 मध्ये भाजपाची वाट बिकट झाली आहे. विरोधी मतांच्या ऐक्यामुळेच कैराना मतदार संघात राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवार तबस्सूम हसन यांना मोठा विजय मिळवणे शक्य झाले. तसेच गोरखपूर आणि फूलपूरपाठोपाठ उत्तर प्रदेशातील अजून एक लोकसभा मतदारसंघातून भाजपाची गच्छंती झाली. आता उत्तर प्रदेशात विरोधकांनी अशीच एकजूट कायम राखल्यास 2019मध्ये येथे भाजपाला एकेका जागेसाठी झुंज द्यावी लागण्याची शक्यता आहे.  विरोधी ऐक्यामुळे मतांचे गणित बदलत असतानाच मतदारांच्या मनात असलेली सुप्त नाराजीही भारतीय जनता पक्षाला भोवत आहे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी कितीही मोठमोठ्या घोषणा करत असले. तसेच भाजपाकडून देशात सुरू असलेल्या विकासकामांचे दाखले दररोज देण्यात येत असले तरी सर्वसामान्यांपर्यंत विकासाचे लाभ म्हणावे तसे पोहोचलेले नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारने साफ निराशा केली आहे. बलात्काराच्या घटना, दलितांच्या प्रश्नांबाबत सरकारच्या भूमिकेमुळे नाराजीत भर पडली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढत चाललेले पेट्रोल आणि डिझेलचे भाव यामुळे सर्वसामान्य होरपळत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये निर्माण होत असलेला असंतोष तसेच विरोधकांची देशपातळीवर होत असलेली एकजुट भाजपासाठी डोकेदुखी ठरणार असून, अबकी बार मुश्किल है यार, असे म्हणण्याची वेळ नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर आली आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहBJPभाजपा