शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केरळमधल्या शाळेत गुणवत्तेवरून ठरतात विद्यार्थ्यांचे गणवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 18:48 IST

केरळमधील एका खासगी शाळेतील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मालाप्पुरम, दि. 11 - केरळमधील एका खासगी शाळेतील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केरळमधल्या एका शाळेनं हुशार आणि ढब्बू विद्यार्थ्यांची वर्गवारी केली असून, त्यानुसार त्या विद्यार्थ्यांना गणवेश घालण्याची सक्ती केली जातेय. शाळेनं जवळपास 800 विद्यार्थ्यांपैकी 32 विद्यार्थ्यांना ढब्बू असल्याचा ठपका ठेवत वेगळा गणवेश दिला आहे.चाइल्ड लाइन आणि बाल अधिकार संस्थेनं शाळेच्या या अजब प्रकारावर जोरदार आक्षेप घेतला असून, तात्काळ ही गणवेशाची पद्धत रद्द करण्याची मागणी केली आहे. शाळेच्या या अनोख्या पद्धतीला पालकांनीही विरोध केला आहे. तसेच चाइल्ड लाइन संस्थेनं ही पद्धत तात्काळ काढून टाकण्याचा इशाराही दिला आहे. शाळेच्या नव्या पद्धतीवर अनेक विद्यार्थी नाखूश असून, यावर केरळ सरकारनं लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी चाइल्ड लाइन संस्थेचे समुपदेशक मोहम्मद राशिद यांनी केली आहे. आम्ही शाळा प्रशासनाची भेट घेऊन याबाबत निषेध नोंदवला आहे. चाइल्ड लाइननं केरळ राज्य आयोगाला यात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.ब-याचदा सर्वधर्मसमभाव, मूल्यसंवर्धन, राष्ट्रीय एकात्मता जोपासून जातिभेद संपविण्याचे धडे विद्यार्थ्यांना दिले जात असताना दुसरीकडे शाळांमध्येच असे प्रकार उघडकीस येत आहेत. महाराष्ट्रातील शाळांमध्येही जातिभेदाचे अनेक प्रकार समोर आले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश देण्याचे आदेश असतानाच हे गणवेश देताना त्यात सर्व मुली, एससी, एसटी आणि फक्त दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठीच तरतूद केली जाते. यात खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेशासाठी तरतूदच नसते. यासाठीचा निधी शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून खर्च होत असल्याने अनेक वेळा गणवेश टक्केवारीत अडकून पडतात. तर गणवेशासाठी जिल्ह्यात 7 ते 8 मोठे कंत्राटदार सेंटिग लावून असतात. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी 15 जून रोजीच गणवेश देण्याचे आदेश होते. प्रत्येक विद्यार्थ्याला दोनशे रुपयांप्रमाणे गणवेशाची रक्कम दिली जाते.एका विद्यार्थ्याला दोन गणवेश द्यावेत, असे आदेश आहेत. तरीही विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाहीत. अनेक शाळांमध्ये शालेय व्यवस्थापन समित्या, मुख्याध्यापकांमध्ये खडाजंगी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. वादावादी झाल्यानंतर गणवेश रकमेच्या चेकवर सह्या केल्या जात नसल्याची उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे काही शाळांतील गणवेश टक्केवारीच्या गर्तेत अडकतात.