शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हिजाबबंदीवरील निकालात मतभिन्नता; एका न्यायमूर्तींनी अपील स्वीकारले, दुसऱ्या न्यायमूर्तींनी फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 06:31 IST

कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत त्याविरोधातील सर्वच्या सर्व २६ याचिका फेटाळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींनी हिजाब घालण्यावर घालण्यात आलेली बंदी उठविण्यास नकार देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने विभाजित निकाल दिला. सरन्यायाधीशांपुढे या याचिका ठेवण्यात याव्यात, त्यासाठी मोठे खंडपीठ स्थापण्याचा निर्णय ते घेतील, असे दोन्ही न्यायमूर्तींनी म्हटले. या प्रकरणात आमच्या मतांमध्ये भिन्नता आहे, असे न्या. गुप्ता यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)

न्यायमूर्ती हेमंत गुप्ता म्हणाले...कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत त्याविरोधातील सर्वच्या सर्व २६ याचिका फेटाळत आहे. हिजाब इस्लाम धर्माच्या परंपरांचा अत्यावश्यक भाग नसल्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालावर मी शिक्कामोर्तब करतो. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी करणे योग्य आहे. (न्यायमूर्ती गुप्ता यांनी आपला निकाल देताना ११ प्रश्न उपस्थित केले. 

न्यायमूर्ती सुधांशू धुलिया म्हणाले...कर्नाटक उच्च न्यायालयाने चुकीचा मार्ग स्वीकारला आहे आणि अधिक काही नाही; पण हिजाब घालणे हा शेवटी ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. माझ्या मनात पहिला प्रश्न या मुलींच्या शिक्षणाचा आहे. आपण या मुलींचे आयुष्य काहीसे सुलभ करतो आहोत का? मी कर्नाटक सरकारचा ५ फेब्रुवारीचा निकाल रद्द करतो. तसेच हिजाबवरील बंदी उठवावी, असे आदेश देतो. 

घटनाक्रम१ जानेवारी २०२२ : कर्नाटकातील उडुपी येथील प्री- युनिव्हर्सिटी कॉलेजमधील काही मुस्लीम मुलींना हिजाब घालून वर्गात जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. ३१ जानेवारी : हिजाबवरील निर्बंधांविरुद्ध उच्च न्यायालयात धाव.५ फेब्रुवारी : कर्नाटक सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घातली.१० फेब्रुवारी : कर्नाटक उच्च न्यायालयाची धार्मिक कपडे घालण्यास मनाई.१३ जुलै : हायकाेर्टाच्या निकालाविरोधात सुनावणीस सर्वोच्च न्यायालय सहमत.२२ सप्टेंबर : सर्वोच्च न्यायालयाने याचिकांवर निकाल राखून ठेवला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय