शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

वंदे भारत अन् अमृत भारत ट्रेनमध्ये नेमका फरक काय? प्रवाशांसाठी का खास असेल? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 13:27 IST

Difference Between Vande Bharat Express And Amrit Bharat Train Full Details: पंतप्रधान मोदी दोन अमृत भारत ट्रेनचे लोकार्पण करणार आहेत. पाहा, डिटेल्स...

Difference Between Vande Bharat Express And Amrit Bharat Train Full Details ( Marathi News ): पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. अयोध्येत रेल्वे स्थानक तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. याशिवाय, काही मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेस आणि अमृत भारत ट्रेन यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसनंतर अमृत भारत ट्रेनविषयी प्रवाशांमध्ये मोठी उत्सुकता असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही ट्रेनमध्ये नेमका फरक काय आहे, प्रवाशांसाठी अमृत भारत ट्रेन कशी खास ठरणार आहे, याविषयी माहिती देण्यात आली आहे. 

नवीन अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन ही सर्वसामान्यांसाठी मोठी भेट ठरू शकते. सुरुवातीच्या टप्प्यात वंदे भारत साधारण म्हणून या ट्रेनला ओखळले जात होते. मात्र, यानंतर अमृत भारत असे नामकरण करण्यात आले. या ट्रेनमध्ये नॉन-एसी ते अनारक्षित तिकिटांचे डबे यांसह अनेक फायदे प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नवीन ट्रेनचे तंत्रज्ञान आणि डब्यांमधील सुविधांमध्ये बरेच बदल केले आहेत. सेमी-हायस्पीड अमृत भारत ट्रेनमध्ये अनेक नवीन प्रयोग करण्यात आले आल्याचे सांगितले जात आहे.

अमृत भारत ट्रेनमध्ये प्रवाशांना काय काय सुविधा मिळतील?

अमृत भारत ट्रेनचे तिकीट दर अन्य मेल/एक्स्प्रेस ट्रेनच्या तुलनेत १५ ते १७ टक्के जास्त असू शकतो, असा कयास आहे. ही ट्रेन ताशी १३० किमीचा वेग गाठू शकते. सुरुवातीला, दिल्लीहून अयोध्या मार्गे दरभंगा आणि बेंगळुरू ते मालदा या मार्गावर या ट्रेन चालवल्या जाणार आहेत. अमृत भारत ट्रेनला २२ डबे असतील. १२ द्वितीय श्रेणी आणि ८ सामान्य श्रेणीचे डबे असतील. याशिवाय गार्डचे दोन डबे असतील. रेल्वेने दिव्यांगांच्या सुविधांची विशेष काळजी घेतली आहे. यासाठी एक स्पेशल सोय करून देण्यात आली आहे. पुश-पुल तंत्रज्ञानावर काम करत असलेल्या या ट्रेनमध्ये दोन्ही बाजूला WAP5 प्रकारातील इंजिन असतील. 

दरम्यान, अमृत भारत ट्रेनमध्ये लगेज रॅक किंवा रॅकवरही कुशन बसवले आहेत. सामान्य ट्रेनच्या तुलनेत आसने आरामदायी आणि आकर्षक बनवण्यात आली आहेत. विशेष बाब म्हणजे अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये मेट्रोचे सीलबंद गँगवे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहज जाऊ शकतात. या ट्रेनमधील प्रत्येक सीटजवळ चार्जिंग पॉइंट देण्यात आले आहेत. प्रवाशांना बॉटल होल्डर मिळेल, जो सहज फोल्ड करता येऊ शकेल.  वंदे भारत एक्स्प्रेसप्रमाणेच अमृत भारत ट्रेनमध्ये झिरो डिस्चार्ज मॉड्यूलर टॉयलेट्स असतील. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वे