नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याने सात वर्षांनंतर पहिल्यांदाच डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. ब्रेन्ट क्रूडने सलग चौथ्या सत्रात मंगळवारी दर घटवले. अलीकडे रुपयाचा भाव वधारल्याने कच्च्या तेलाचा दर कमी होण्यास मदत होईल. डिझेलच्या दरात अल्पशी घट झाली तरी त्याचा मोठा परिणाम महागाई काही प्रमाणात कमी होण्याच्या रूपाने दिसून येईल. तसेच, असे झाल्यास रिझर्व्ह बँकेलाही ३० सप्टेंबर रोजी सादर होणाऱ्या पतधोरणाद्वारे व्याजदरात कपात करण्यास वाव मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
डिझेलचे दर घटणार
By admin | Updated: September 10, 2014 03:39 IST