शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Income Tax: तुमच्याकडूनही झाली आहे का ही चूक? तर घरी येऊ शकते इन्कम टॅक्सची नोटिस, जाणून घ्या कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 17:40 IST

Income Tax: जर तुम्ही करदाते असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे. तुमच्या एखा चुकीमुळेही तुम्हाला प्राप्तिकर विभागाची नोटिस येऊ शकते. तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांवर सरकारची बारीक नजर असते.

नवी दिल्ली -  जर तुम्ही करदाते असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे. तुमच्या एखा चुकीमुळेही तुम्हाला प्राप्तिकर विभागाची नोटिस येऊ शकते. तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांवर सरकारची बारीक नजर असते. जर तुम्ही एका मर्यादेपेक्षा जास्त रोख रकमेमध्ये व्यवहार केला, तर तुम्हाला प्राप्तिकर विभागाची नोटिस येऊ शकते.

प्राप्तिकर विभागाला बँक, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज हाऊस आणि  प्रॉपर्टी रजिस्ट्रारजवळ जर कुणी मोठे कॅश ट्रान्झॅक्शन करत असेल तर त्याची माहिती द्यावी लागते, अशा परिस्थितीत जर तुम्हीही डिजिटलऐवजी कॅश ट्रान्झॅक्शन अधिक प्रमाणात करत असाल तर तुम्ही चूक करत आहात. आज आपण जाणून घेऊयात काही अशा ट्रान्झॅक्शनबाबत ज्यामधून तुम्हाला प्राप्तिकर विभागाची नोटिस येऊ शकते.

जर तुम्ही ३० लाख किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेची खरेदी रोख रकमेमध्ये केली किंवा विक्री केली तर याची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली जाईल. अशा परिस्थितीत प्राप्तिकर विभाग तुमच्याकडे याबाबत चौकशी करू शकतो. तुमच्याकडून या रोख रकमेच्या सोर्सची माहितीही घेतली जाऊ शकते.

जर तुम्ही क्रेडिट कार्डचं बिल रोख रकमेमध्ये जमा करत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. जर तुम्ही एका वेळी क्रेडिट कार्ड एक लाख रुपयांच्या वर जमा करत असाल तर प्राप्तिकर विभाग तुमच्याकडे चौकशी करू शकतो. जर तुम्ही एका आर्थिक वर्षामध्ये १० लाख रुपयांपेक्षा अधिकच्या क्रेडिट कार्डचं बिल रोख रकमेमध्ये करत असाल तर तुम्हाला त्याचा सोर्सही सांगावा लागेल.

जर तुम्ही शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असाल किंवा म्युच्युअल फंड, डिबेंचर आणि बॉण्डमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रकमेची देवाणघेवाण करत असाल तर सतर्क राहा. एका आर्थिक वर्षामध्ये यामधील १० लाख रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक केल्यास तुम्हाला इन्कम ट्रॅक्स विभागाची नोटिस मिळू शकते.

जर तुम्ही फिक्स डिपॉझिटमध्ये वर्षाला १० लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे जमा करत असाल तर इन्कम टॅक्स विभाग तुमच्याकडे या पैशांच्या सोर्सची माहिती मागू शकतो. तुम्ही डिजिटल पद्धतीने पैशांना एफडीमध्ये गुंतवा, त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाकडे तुमच्या ट्रान्झॅक्शनचा रेकॉर्ड राहील. तसेच तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही.

ज्या पद्धतीने फिक्स डिपॉझिटमध्ये वर्षाला १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक कॅश जमा केला तर तुमच्याकडे विचारणा होऊ शकते. त्याशिवाय जर तुम्ही कुठलीही बँक किंवा को ऑपरेटिव्ह बँकेमध्ये वार्षिक  १० लाख किंवा त्यापैक्षा अधिक रक्कम कॅशमध्ये जमा करत असाल तक तुम्ही इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर येऊ शकता. अशा परिस्थितीत कुठलीही रक्कम जमा करायची असेल तर ऑनलाईन करा, जेणेकरून तुमच्या व्यवहारांची माहिती राहू शकते.  

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सTaxकर