शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
4
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
5
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
6
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
7
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
8
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
9
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
10
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
11
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
12
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
13
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
14
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
15
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
16
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
17
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
18
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
19
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत

खरेच फ्लाइंग किस दिले का? भाजपच्या २२ महिला खासदारांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 06:20 IST

भाजप खासदार हेमा मालिनी यांनी संसदेत असे काही झालेच नसल्याचे सांगत स्मृती इराणींच्या दाव्यातील हवाच काढली. 

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किस देण्याचा आरोप करत भाजपच्या २२ महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. यामुळे राहुल गांधी यांचे खरे चरित्र बाहेर आले, असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. मात्र भाजप खासदार हेमा मालिनी यांनी संसदेत असे काही झालेच नसल्याचे सांगत स्मृती इराणींच्या दाव्यातील हवाच काढली. 

काँग्रेस म्हणते...काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी कोणालाही फ्लाइंग किस दिलेले नाही. त्यांच्या हातून काही कागदपत्रे पडली होती. ती उचलत असताना त्यांच्या हाताकडे पाहून असे वाटले असावे. तसेही भाजपचे सरकार राहुल गांधी यांना संसदेत पाहू इच्छित नाही. 

 

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावीमणिपूरमध्ये महिलांवर झालेले अत्याचार अत्यंत वेदनादायी आहे. सरकारने तातडीने लक्ष घालून तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तेथील हिंसाचार थांबायला हवा, महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हायला हवे. मणिपूर लहान राज्य असले तरी तो देशाचा अविभाज्य भाग आहे. राजकारण बाजूला ठेवून सरकारने तिथे शांतता प्रस्थापित करावी.

पंतप्रधानांना हटवणे सोपी गोष्ट नाहीकेंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील १४० कोटी लोकांच्या हृदयात आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले, तरी मोदींचे काहीही बिघडवू शकत नाही. त्यांना हटवणे सोपी गोष्ट नाही. जनता दल, राष्ट्रीय जनता दलात केवळ घराणेशाहीलाच प्राधान्य दिले जात असल्याने मी त्यांना रामराम ठोकला.

त्यांना माहिती आहे काही फायदा नाही, तरीही...विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव हा आधारहीन असल्याची जाणीव त्यांनाही आहे. २०१८ मध्येही विरोधकांनी निवडणुकीच्या एक वर्षापूर्वी अविश्वास प्रस्ताव आणला होता. यावेळीही तेच झाले आहे. निवडणुकीपूर्वी अविश्वास प्रस्ताव आणून आगामी निवडणुकीत फायदा होईल, असे विरोधकांना वाटते, पण ते अशक्य आहे.

आज मणिपूर जळतेय, उद्या संपूर्ण ईशान्य जळेल मणिपूरमध्ये उद्भवलेली परिस्थिती अत्यंत भयावह आहे. तुम्ही मणिपूरच्या मुद्द्याला सहजतेने घेऊ शकत नाही. सरकारला अद्याप तेथील गांभीर्य कळालेच नाही. आम्ही तेथील परिस्थिती पाहून आलोय. आज मणिपूर जळत आहे, उद्या मिझोरम जळेल, परवा नागालँड जळेल आणि त्याचा परिणाम संपूर्ण ईशान्य भारतावर होईल.

डबल इंजिन सरकार फेल ठरलेतीन महिन्यांपासून मणिपूर धगधगत असताना केंद्र सरकार एवढे शांत का आहे? तेथील प्रश्न सोडवण्यासाठी ते पुढाकार का घेत नाही. मणिपूरमधील डबल इंजिन सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे. शासकीय शस्रागारातून शस्त्रास्त्रे चोरली जात असताना राज्य सरकार काय करत आहे? केंद्रानेही त्याकडे दुर्लक्ष करून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

न्यायालयाने हस्तक्षेप केल्यावर तरी जागे व्हा  मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यासाठी सरकार इतके अपयशी ठरले, की कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला. ही गोष्ट तुमच्यासाठी लाजिरवाणी नाही का? किमान आता तरी जागे व्हा. तीन महिन्यांपासून तेथे खून, बलात्कार, हिंसाचार होत आहे. मणिपूरमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत अधिक सुरक्षादले तैनात केले असतानाही तेथील परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनNo Confidence motionअविश्वास ठराव