शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'राफेलची कागदपत्रे चोरांनी आणून दिली की काय?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 04:57 IST

पी. चिदम्बरम यांचा अ‍ॅटर्नी जनरल व केंद्र सरकारला उपरोधिक सवाल

नवी दिल्ली : राफेलसंबंधीची कागदपत्रे चोरीला गेली नाहीत, तर त्यांच्या फोटोकॉपी काढण्यात आल्या, असा खुलासा अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांना करावा लागल्यानंतर काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांनी, ‘ती कागदपत्रं चोरांनी आणून दिली की काय?’ इसा उपरोधिक सवाल शनिवारी विचारला आहे.अ‍ॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात राफेलची कागदपत्रे चोरीला गेल्याचा दावा केला होता. त्यानंतर ती कशी चोरीला गेली, असे प्रश्न विरोधकांनी विचारताच, ती चोरीला गेली नसून, त्यांच्या फोटोकॉपी काढण्यात आला, असा सारवासारवीचा खुलासा शुक्रवारी वेणुगोपाल यांनी केला. त्यामुळे ती कागदपत्रे गुरुवारी चोरांनी परत आणून दिली की काय, असा सवाल चिदम्बरम यांनी केला.वेणुगोपाल यांनी न्यायालयात कागदपत्रे चोरीला गेल्याचे सांगताच, मोदी सरकार खोटे बोलत असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुलगांधी यांनी केला होता. तसेच ती कागदपत्रे चोरीला कशी गेली, याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती. ती कागदपत्रे चोरीला गेल्याचे सांगताच, त्याची तक्रार केली का, असा प्रश्नही उपस्थित झाला होता. पण तशी तक्रार सरकारतर्फे पोलिसांकडे करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले होते. आता ती कागदपत्रे चोरीला गेली नव्हती, असे अ‍ॅटर्नी जनरल सांगत आहेत, तर त्यांनी न्यायालयाला चुकीची माहिती का दिली, ती कोणाच्या सांगण्यावरून दिली, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. त्यातूनच चोरांनी ती कागदपत्रे परत आणून दिली की काय, असा उपरोधिक प्रश्न पी. चिदम्बरम यांनी विचारला. द हिंदू या इंग्रजी दैनिकाने राफेल व्यवहारात घोटाळा झाल्या असल्याच्या काही बातम्या कागदपत्रांच्या आधारे दिल्या होत्या. त्यामुळे त्या दैनिकावर आॅफिशिअल सिक्रेट्स अ‍ॅक्टद्वारे कारवाई करण्याचा इशाराही सरकारने दिला होता.न्यायालयात चुकीचे का सांगितले?आता अ‍ॅटर्नी जनरल यांच्यामार्फत झालेल्या खुलाशातून मोदी सरकारने आपले म्हणणेच बदलले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोदी सरकारनेच अ‍ॅटर्नी जनरल यांना कागदपत्रे चोरीला गेल्याची माहिती न्यायालयात देण्यासाठी दिली होती का, असाही सवाल अनेक वकील विचारत आहेत, तर अ‍ॅटर्नी जनरलनी न्यायालयात चुकीच्या पद्धतीने मांडणी केल्याने हा गोंधळ उडाल्याचे भाजपा नेते सांगताना दिसत आहेत. या व्यवहाराची माहिती देण्यास सरकारने संसदेमध्येही नकार दिला होता. त्यामुळे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदीP. Chidambaramपी. चिदंबरमSupreme Courtसर्वोच्च न्यायालय