शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारताने डिक्शनरीतील 'अभिनंदन' शब्दाचा अर्थ बदलला - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 13:06 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याचे कौतुक केले आहे.

ठळक मुद्दे नवी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये 'कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी इंडिया 2019'चे उद्धाटन  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.भारताने डिक्शनरीतील 'अभिनंदन' शब्दाचा अर्थ बदलला - नरेंद्र मोदीनरेंद्र मोदी यांनी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याचे कौतुक केले आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याचे कौतुक केले आहे. भारताने डिक्शनरीतील अभिनंदन शब्दाचा अर्थ आता बदलला आहे. या देशात शब्दांचा अर्थ बदलण्याची ताकद आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. नवी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये 'कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी इंडिया 2019'चे उद्धाटन  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  

देश आता एक पराक्रमी राष्ट्र म्हणून पुढे जात आहे. भारताच्या प्रत्येक गोष्टीकडे जगाचे लक्ष लागले आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच,  यावेळी अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याचे कौतुक नरेंद्र मोदी यांनी केले. ते म्हणाले, 'या देशात अशी ताकद आहे की, शब्दांचा अर्थ बदलला जातो. आधी अभिनंदनचा अर्थ इंग्रजीत 'Congratulation' असा होता. मात्र, आता अभिनंदनचा अर्थ बदलला जाईल.' 

दरम्यान, पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतात सुखरुप परतले. अभिनंदन वर्धमान यांनी दाखवलेल्या शौर्याचा अभिमान सर्वच भारतीयांना आहे. शुक्रवारी रात्री सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानने अभिनंदन वर्धमान यांना वाघा बॉर्डरहून भारताच्या स्वाधीन केले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण देश सज्ज होता.

गेल्या महिन्यात 14 फेब्रुवारी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर  भारतीय हवाई दलाच्या विमानांनी मंगळवारी (26 फेब्रुवारी) पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने बुधवारी (27 फेब्रुवारीला) सकाळी भारतात घुसखोरी केली. यावेळी पाकिस्तानच्या विमानांना पिटाळून लावताना भारताचे मिग-21 लढाऊ विमान कोसळले असता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पॅराशूटद्वारे खाली उडी मारली. मात्र,अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या हद्दीत गेले. त्यावेळी त्यांना पाकिस्तानच्या लष्कराने ताब्यात घेतले. अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेची आग्रही मागणी भारताने केली होती. त्यानंतर पाकिस्तानने शुक्रवारी रात्री अभिनंदन वर्धमान यांना भारताकडे सुपूर्द केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमान