शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचा लाखमोलाचा सूट खरेदी करणाऱ्या हिरे व्यापाऱ्याला कोटीचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 06:24 IST

गंडा घालणारे कोशिया बंधू फरार

सुरत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लाखमोलाचा सूट २०१५ मध्ये एका जाहीर लिलावात ४ कोटी ३१ लाख रुपयांत विकत घेणारे सुरतचे हिरे व्यापारी लालजीभाई पटेल यांना दोन भावांनी एक कोटी रुपयांना गंडविल्याचे उजेडात आले आहे.धर्मानंद डायमंड्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन लालजीभाई पटेल हे २०१५ मध्ये मोदींचा किमती सूट खरेदी केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आले होते. हिंमत आणि विजय कोशिया बंधूंनी पैलू न पाडलेले हिरे मागच्या वर्षी उधारीवर खरेदी केले होते. त्या हिऱ्यांची किंमत चुकती न करता या दोघांनी लालजीभाई पटेल यांच्या कंपनीला फसविले. याप्रकरणी २२ एप्रिल रोजी सुरतमधील कटारगाम पोलीस ठाण्यात धर्मानंद डायमंड्सचे व्यवस्थापक कमलेश केवडिया यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.कोशिया बंधूंचा पत्ताच लागत नाही. कटारागाममधील त्यांच्या कार्यालयाला टाळे असल्याचे आढळले, असे केवडिया यांनी पोलिसांना सांगितले. कोशिया बंधूंनी यापूर्वीही अन्य डायमंड कंपन्यांना गंडविलेले आहे. तक्रार दाखल करून चौकशी सुरूकरण्यात आली आहे, असे पोलीस निरीक्षक झेड. एन. घासुरा यांनी सांगितले. काय आहे प्रकरण?कोशिया बंधूंनी धर्मानंद डायमंड्स कंपनीचा विश्वास संपादित करून आॅक्टोबर २०१८ मध्ये १,५०० कॅरेटस वजनाचे पैलू न पाडलेले हिरे घेतले होते. या हिºयांची किंमत १ कोटी आहे. हे दोन्ही भाऊ फरार आहेत. हिरे उद्योगाच्या नियमातहत १२० दिवसांत पैसे चुकते करण्याची हमी कोशिया बंधंूनी दिली होती. तथापि, हा अवधी संपल्यानंतर व्यवस्थापक केवडिया यांनी त्यांना पैसे देणे बाकी असल्याची आठवण करून देण्यासाठी फोन केला; परंतु दोघांचे मोबाईल फोन बंद होते, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी